Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एचआयव्ही संसर्गित रुग्णांसाठी डायलिसीस मशिनची सोय उपलब्ध होणार - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

एचआयव्ही संसर्गित रुग्णांसाठी डायलिसीस मशिनची सोय उपलब्ध होणार - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली दि. 30  : एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या उपचारासाठी डायलिसीस मशिनची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला तात्काळ मंजूरी देण्यात येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे एचआयव्ही बाधीत रुग्णांच्या उपचाराठी डायलिसीस मशिनची सेवा तातडीने सुरू करण्यात येईल. त्यामुळे बाधीत रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य्‍ होईल. यापुढची आवश्यकती प्रक्रिया तातडीने पार पाडावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त सपना घुणकीकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जोशी व सर्व एआरटी सेंटर चे वैद्यकीय अधिकारी व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सध्याला एड्स आजारावरील औषधांचा तुटवडा असून या रुग्णांना वेळेत व नियमित औषधोपचार होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, याच बरोबर गर्भवती मातांची एचआयव्ही तपासणी पहिल्या तिमाहीत करण्याबाबत योग्य ते नियोजन करावे . एचआयव्ही संसर्गित रुग्णांना डायलेसिस गरज असते त्यावेळी सरकारी दवाखान्यात रुग्ण भार अधिकचा असल्याने ही सोय उपलब्ध होण्यास विलंब होतो. त्यामुळे संबंधित रूग्णांना खाजगी रुग्णालयात अधिकची बिल रक्कम देऊन त्यांना इलाज करावा लागतो. अशा वेळी रुग्णांची पिळवणूक होत असते व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना ही सेवा परवडत नाही. जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित रुग्णासाठी वेगळी डायलिसिस मशीन मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यास तात्काळ मंजुरी देऊन लवकरात लवकर ही सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे सुरू करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.