Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत एकाचा निघृर्ण खून, एकजण गंभीर जखमी

सांगलीत एकाचा निघृर्ण खून, एकजण गंभीर जखमी


मंगळवारी रात्रीची वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील घटना, दोघे ताब्यात

सांगली : शहरातील वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याजवळ एकमेकाकडे रागाने पाहण्याच्या कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. चार संशयितांनी हे कृत्य केल्याचे प्रत्यक्षदशीर्नी सांगितले. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक अजित टिके, संजयनगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. 

तुकाराम मोटे (वय २७) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी रात्री तुकाराम त्याच्या मित्रासोबत वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याजवळ बोलत थांबला होता. काही अंतरावर संशयितही बोलत थांबले होते. त्यावेळी एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर संशयितांनी चाकूने तुकाराम आणि त्याच्या मित्रावर वार केले. चाकूचा वार वमीर् बसल्याने तुकाराम जागेवरच कोसळला. त्यानंतर संशयितांनी तेथून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत तुकारामला सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यापूवीर्च त्याचा मृत्यू झाला होता. तर यात त्याच्या मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.