शरद पवारांनी पाठिंबा दिला मी राष्ट्रपती होऊ शकतो - अभिजीत बिचुकले
मुंबई : सध्या राज्यातील राजकीय पक्ष विधान परिषदेसाठी शेवटची जुळवाजुळव करत आहेत. तर अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यासाठी आवश्यक आमदार खासदाराचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी त्यांनी महत्वपूर्ण विधान केलंय. “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीअध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल”, असं बिचुकले म्हणालेत.
पवारांनी पाठिंबा द्यावा- बिचुकले
“राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीअध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल. पवारांचं आमदार ऐकतात. मला आमदारांच्या सह्या मिळतील आणि माझा राष्ट्रपती होण्याचा मार्ग सोपा होईल. मी राष्ट्पती होऊ शकतो”, असं बिचुकले म्हणालेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
