Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माथाडी, सुरक्षा रक्षक मंडळाची पोलखोल भाग—१

 माथाडी, सुरक्षा रक्षक मंडळाची पोलखोल भाग—१


सांगली जिल्हा माथाडी, सुरक्षा रक्षक मंडळात अनागोंदी  सेवानिवृत्त अधिकाऱ्याला बेकायदा मुदतवाढ, 


सांगली: सांगली जिल्हा माथाडी तसेच सुरक्षा रक्षक मंडळात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप सदस्यांकडून केला जात आहे. मंडळाचे अनेक नियम डावलून कामकाज होत असल्याची तक्रार कामगार सचिव, आयुक्तांकडे काही सदस्यांनी केली आहे. चार वषार्पूवीर् निवृत्त झालेल्या एका निरीक्षक दजार्च्या अधिकाऱ्याला बेकायदा मुदतवाढ देण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे. शिवाय त्या अधिकाऱ्याला दोन मंडळावर निरीक्षक म्हणूनही नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच या अधिकाऱ्याला दोन्ही पदाचे मानधन देण्यात येत आहे असाही आरोप केला जात आहे. 

मंडळाच्या नियमानुसार एका विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी असा शासन निणर्य आहे. ही नियुक्ती करार पद्धतीने करण्यात येते. नियमित मंजूर पदावर त्यांची नियुक्ती करता येत नाही. तरीही निवृत्त झालेल्या या अधिकाऱ्याची गेल्या चार वषार्पासून नियुक्ती करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित वादग्रस्त अधिकारी माथाडी व सुरक्षा रक्षक निरीक्षक पदावरून वयोमानानुसार चार वषार्पूवीर्च निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पदाचा अतिरिक्त कायर्भार अन्य अधिकारी अथवा योग्य कमर्चाऱ्याकडे देणे क्रमप्राप्त असतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय गेल्या चार वषार्पासून त्यांना सतत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही मंडळांसाठी निरीक्षक मिळत नाहीत का असा प्रश्न विचारला जात आहे. या अधिकाऱ्यावर प्रशासन एवढे का मेहरबान आहे अशी चचार् आता सदस्यांमध्ये रंगली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.