Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दाऊद गँगची भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना धमकी, म्हटले - तुझी हत्या होणार आहे

 दाऊद गँगची भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना धमकी, म्हटले - तुझी हत्या होणार आहे


भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. एका व्यक्तीने त्यांना फोन करून सांगितले की, मी इक्बाल कासकरचा माणूस बोलत असून तुझी हत्या होणार आहे, असे फोनवर सांगितले.

दरम्यान पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.

भाजप खासदाराने भोपाळमधील टीटी नगर पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, कोणीतरी फोनवरून धमकी दिली आहे. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा माणूस म्हणून दिली. तसेच 'तुझा खून होणार आहे, असे सांगितले. साध्वीसोबत असलेल्या लोकांनी या संभाषणाचा व्हिडिओही रेकॉर्ड केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे साध्वीने केले समर्थन

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा बचाव केला होता. या प्रकरणात त्यांनी भारत हिंदूंचा असल्याचे म्हटले होते. पाखंड्यांनी नेहमीच असे केले आहे. चित्रपट बनवून हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत सनातन येथे राहणार असून त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी म्हटले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.