Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'हा सैन्य दलाचा अपमान', संजय राऊत मोदी सरकारवर भडकले

 'हा सैन्य दलाचा अपमान', संजय राऊत मोदी सरकारवर भडकले


मुंबई, 18 जून : केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला भारतातील अनेक भागांतून विरोध . होताना दिसत आहे. उत्तर भारतामध्ये तरुणांमध्ये आगडोंब उसळला आहे. ' सैनिक कधीही कंत्राटपद्धतीने घेतले गेले नाही. देशाची सुरक्षा ज्यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत असं कसं होऊ शकेल.

हा भारतीय सैन्य दलाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अपमान आहे' अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'वरून उत्तर भारतात संतप्त पडसाद उमटत आहे. अनेक तरुण मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 'मोदी सरकारची प्रत्येक योजना ही अपयशी ठरली आहे. प्रत्येक योजना अशीच आहे. आधी 2 कोटी नोकरी देण्याची घोषणा केली होती. अच्छे दिनचे स्वप्न दाखवलं होतं.

आता काय तर अग्निपथ काढले आहे. सैन्य हे पोटावर चालत असते. सैन्यात एक शिस्त असते. सैन्यात कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे, भारतीय सैन्याची प्रतिष्ठा आहे ती रस्सातळाला जाईल, अशी टीका राऊ यांनी केली. तसंच, 'सैनिक कधीही कंत्राटपद्धतीने घेतले गेले नाही. कामगारांना आणि गुलामांना कंत्राटीपद्धतीने घेतलं जात असतं. देशाची सुरक्षा ज्यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत असं कसं होऊ शकेल. हा भारतीय सैन्य दलाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अपमान आहे' अशी टीकाही राऊत यांनी केली. 'राष्ट्रपती निवडणुकीसाठी हालचाली सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून फोन केला जात असतो. भाजपकडून देशभरातील पक्षाला फोन केले जात आहे.

राजनाथ सिंह यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. मोदी सरकारचे लोक संपर्कात आहे. दोन्ही बाजूने समर्थन असलेला उमेदवार उभा केला जात आहे. त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे' अशी माहितीही राऊत यांनी दिली. (आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; कर्मचाऱ्याने जीवाची पर्वा न करता केलं भलं काम,) घोटाळा झाल्याचे आरोपीने मान्य केले आहे. विक्रांत बचावच्या नावाखाली ते पैसे राजभवनात जमा केले नाही. ते पैसे आपल्याकडेच ठेवले. नंतर आता भाजपकडे जमा केले आहे, असं सांगत आहे. हा एक घोटाळा आहे. पोलीस अधिक तपास करत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.