टक्केवारीचे भूत कधी उतरणार ?
कोरोनाचया पार्श्वभुमीवर सरकारने घेतलेला २५ टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला आहे तर मग इतकी वर्षे हा अभ्यासक्रम उपयोगी होता का नाही हा प्रश्न उभा राहतो .अलिकडे शाळांचा निकाल १०० टक्के लागल्यावर त्याची खुप Advertise केली जाते . पण प्रत्यक्षात किती विद्यार्थी चांगल्या मेरीट ने उत्तीर्ण झाले हा संशोधनाचा विषय आहें. *जर विषयवार गुणांचे अवलोकन केले तर यांतील फोलपणा लक्षात येतो* . चार - दोन विद्यार्थी चांगल्या मेरीट ने उत्तीर्ण होऊन बाकीचे सर्व विद्यार्थी असमाधानकारक गुणांनी उत्तीर्ण होतात हे जवळपास सर्वच निकालाचे वास्तव आहे.
बर यांतील जवळपास २० टक्के गुण हे शाळांचे अंतर्गत असतात .टक्केवारीचा अभ्यास केलेस ९० टक्क्याचेवर किती विद्यार्थी , ८० ते ९० टक्क्याचे किती विद्यार्थी , ३५ टक्क्याचेवर किती विद्यार्थी आहेत यांतील तफावत व गांभीर्य लक्षात येईल.बरे टक्केवारीवरच मूल्यमापन करावयाचे झाल्यास जे विद्यार्थी दहावी अथवा बारावीत बोर्डात पहिल्या वीस मध्ये नंबर मिळवतात (काही ठिकाणी अशा विद्यार्थ्यांचे जंगी सत्कार व मिरवणूका काढल्या जातात) असे विद्यार्थी अपवाद वगळता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे फार यशस्वी झालेत का , त्यांचा या अमूल्य टक्केवारीचा देशाला वा समाजाला काही ऊपयोग झाला का याचा मागोवा घेतल्यास फारसं आनंददायक चित्र दिसत नाही.पुस्तकी हुशारी आणी शहाणपण याचे मूल्यमापन कधी होणार आहे ?
शिवाजी पाटील
सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
