Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकीकडे पैसेवाली आय. पी. एल. दुसरीकडे पैशाचे राजकारण...!

एकीकडे पैसेवाली आय. पी. एल. दुसरीकडे पैशाचे राजकारण...!


२६ मार्च ते २९ मे या काळातील ७७ सामन्यांची आय.पी.एल अंतिम सामना अहमदाबादला होणार हे  स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जाहीर झालेले होते. त्याच दिवशी हेही ठरले होते की, अंतिम सामन्यात गुजराथचा संघ राहणार आिण तोच संघ जिंकणार. क्रिकेटमधील ‘दर्दी’ लोक पहिल्या िदवसांपासून हे भाकित करत होते की, नव्याने दाखल झालेली गुजराथची टीम अंतिम सामना िजंकणार! जणू हे सगळे ‘िफक्सिंग’ होते. २९ तारखेचा सामन्ाा तर हस्यास्पद होता. राजस्थान रॉयल्स संघाने ‘आपल्याला सामना हारायचा आहे,’ असेच ठरवून ते खेळले. २ िदवस आगोदर बंगळुरूच्या संघाशी खेळून िजंकणारा हाच संघ होता का? तर तसा तो संघ नव्हता. 

आयपीएल आता पैशांचा खेळ झालेला आहे. अाधीपासूनच तो होताच. या नव्या टूममुळे काही िक्रकेट खेळाडू कोट्यधीश बनून गेेले. इशांत िकशन मुंबई संघातला. १५ कोटी रुपयांना विकला गेला. त्याची दांडी तीनताड उडवायची, हे आधीच ठरवले होते. संपूर्ण स्पर्धेमध्येच ७७ सामन्यांत चर्चा हीच होत होती की, ‘गुजराथच अंतिम सामन्यात आिण अहमदाबादला तोच संघ िजंकणार’ िशवाय हा सामना पाहायला देशाचे गृहमंत्री, गांधीनगरचे खासदार श्री. अमित शहा हे  खंळाडूंच्या समोरच बसलेले होते. व्हीआयपी कक्षात नव्हते. त्यांचे चिरंजीव क्रिकेट संघटनेचे सचिव जय शहा हे ही सामना पाहात होते. त्यामुळे निकाल ठरलेलाच आहे, असे बोलले जात होते. झालेही तसेच. या आयपीएलने काही क्रिकेटपटूंचे भले झाले. पण काही क्रिकेटपटूंनी आता थांबावे, असे त्यांचे खेळणे होते. त्यात रोहीत शर्मा, जडेजा, काही प्रमाणात धोनीसुद्धा. काही नवीन तरुण खेळाडूंनी चमक दाखवली असली तरी एकूणच हा पैशांचा खेळ आहे. 

कोहलीला बाद केल्यावर धोनीने टाळ्या वाजवायच्या आहेत... धोनी बाद झाल्यावर रोहीत शर्माने टाळ्या वाजवायच्या आहेत. ‘आपलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’, असा हा खेळ आहे. ललित मोदींनी हा खेळ आणला. या देशात नवीन-नवीन खेळ आिण नवीन -नवीन काहीतरी सुरू करण्यात मोदींचा पुढाकार असतोच. तसेच या स्पर्धेचेही आहे. यामध्ये क्रिकेट गतिमान होते की नाही, हा भाग वेगळाच. पण अस्सल िक्रकेट मातीत घातले गेलेले आहे. ५० वर्षांपूर्वीच्या ५ िदवसांच्या सामन्यात शास्त्रसुद्ध खेळणाऱ्या खेळाडूला िदवसाला १० रुपये िमळत होते. हे आज कोणाला खरे वाटेल? बापू नाडकर्णी एकदा मला म्हणाला होता, ‘आम्ही उगाच लवकर जन्माला आलो. पुढच्या िपढींमध्ये गुणवत्ता असो, नसो त्यांचे आर्थिकदृष्ट्या भले झाले. त्यांचे नशीब...’

आणखी एक गंमत बघा... ९ जूनपासून आफ्रिकेचा संघ दौऱ्यावर येत आहे. तोसुद्धा पाच टी-२० सामन्यांसाठी. त्या संघाविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार आहे के. एल. राहुल. आयपीएलमध्ये लखनौच्या संघाचा कर्णधार राहुल होता आिण त्याचा ओपनिंगचा सहकारी िक्लंटन डी. कॉक हाेता. त्याने एकदा ८० धावा केल्या तेव्हा राहुलनी टाळ्या वाजवल्या. राहुलनी ३ शतके ठोकली तेव्हा कि्लंटननी टाळ्या वाजवल्या. आता ९ जून ला सुरुवातीलाच फलंदाजीला उतरणारा आफ्रिकेचा कि्लंटन डी. कॉक बाद झाल्यावर राहुल टाळ्या वाजवणार.... िक्रकेटचे सगळे संदर्भच बदलून गेलेले अाहेत. त्यामुळे हा खेळ रािहलेला नाही. या खेळात पैसा िशरल्यामुळे हा ‘पैशांचा खेळ’ झालेला आहे. 

अर्थात याच खेळाला दोष का द्यावा? देशाचे सर्वच राजकारण आता पैशांभोवती फिरते आहे. िनवडणुकीमध्ये ‘घोडेबाजार’ हा शब्द उघडपणे वापरला जात आहे. विधानसभा िकंवा लोकसभेच्या िनवडणुकीत तिकीट देताना ५० वर्षांपूर्वीच्या उमेदवारांना मुलाखत द्यावी लागायची. त्या त्या पक्षाचे नेते उमेदवारांची कसून मुलाखत घ्यायचे. १०-१५ िमनिटांच्या प्रश्नोत्तरांनतर उमेदवारी ठरायची. आता दोन िमनीटांत २ उमेदवार संपवतात. दोनच प्रश्न विचारततात. त्यातील पहिला प्रश्न.... 

१) तू िकती खर्च करू शकशील? 

२) तुझ्या जातीची मतं िकती? 

जातीची मते जास्त असतील आिण भरपूर पैसा खर्च करण्याची कुवत असेल, तर तिकीट पक्के. राजकारणामध्येही आता पैसा आिण जात महत्त्वाची ठरली. आयपीएल िक्रकेटमध्ये पैसा आिण सामना कुठे खेळवायचा, हे शहर महत्त्वाचे ठरले त्यातून विजयी कोण होणार, हेही ठरले.

राजकीय तत्त्वज्ञाान, निवडणुकीच्या सभा, प्रचारसभेऐवजी विचारसभा, याची आता काही गरज नाही. महागाई वाढली, बेकारी वाढली, गॅस सिलिंडर हजारांच्या वरती गेले. पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले. सामान्य माणसांना जगणे अशक्य झाले. सामान्य माणसाला ‘स्वत:चे घर’ ही कल्पना संपूनच गेली. शहरांमध्ये पाट्या झळकल्या... एक खोली, दोन खोल्यांचे कोट्यवधी रुपये आिण त्यासाठी नवीन शब्द आला.... वन बी.एच. के. - टू बी. एच. के.... त्याची जाहिरात झाली... जाहिरातीमध्ये गॅलरी दाखवली गेली... पुढे निसर्ग दाखवला गेला... आिण किंमत िलहिली गेली.... ६० लाख, ७० लाख, १ कोटी, २ कोटी फक्त..... पुढे आणखी लिहिले गेले ‘नो स्टँपड्यूटी’. ‘ओ. सी. रिसिव्हड’.... इमारत अजून बांधायची आहे... त्याच्या आगोदरच यांना ओ. सी. िमळते. त्याची जाहिरात होते... सगळे काही पैशांच्या जोरावर आता या दुनियेत करता येते. आयपीएल हाही एक त्याचाच भाग आहे. सट्टेबाजारातील लोकांना त्याचा खड्ानखडा पत्ता आहे. एका िमत्राने एक गोष्ट सांिगतली... ‘आयपीएलमध्ये एका सामन्यात ऋतुराज गायकवाड हा खेळाडू ९९ धावांवर होता.

एकाने त्या क्षणालाच सांगितले... पुढच्या चेंडूवर हा बाद होणार म्हणजे होणारच... आिण तसा तो बादही झाला.’ मैदानावर जे खेळणारे आहेत त्यांचा खेळ बाहेर कोणाच्यातरी हातात आहे... आिण ज्यांच्या हातात आहे, त्यांच्या हातात पैसा आहे. हे गणित आता सगळ्यांना मािहती झाले आहे. राजकारण त्यापेक्षा काही वेगळे नाही. पूर्वी एक कार्यकर्ता तयार व्हायला १५-१५ वर्ष राबावे लागायचे. तेव्हा कुठे ‘कार्यकर्ता’ म्हणून नाव मिळायचे. आता त्याची गरज नाही. तुमच्या वाढिदवसाला दिवसभराच्या लाख-लाख रुपयांच्या भाड्याचे पोस्टर्स झळकवण्याची क्षमता असेल तर तुम्ही ‘कार्यसम्राट’ होवू शकता... पुढारी होवू शकता... शिवाय एकाच पक्षात निष्ठेने काम करण्याची आता गरज राहिलेली नाही. जिथं आपल्याला काही िमळेल तो आपला पक्ष. मग त्या पक्षाला... काल आपण िशव्या घालत होतो.... जाहीर सभा घेवून अगदी पंतप्रधानांची नावे घेवून, पुरावे देवून काय काय बोलले होतो.... आज आपण काय बोलताे आहोत... काल मी महाराष्ट्राच्या िवधासभेचा विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा काय बोलत होतो.... आज काय बोलत आहे... आपल्याला लाेकं हसत असतील, असा काही एक विचार करायची गरज आता राहिलेली नाही. ‘मला काय िमळते अाहे’ एवढं बोला... 

मला काही िमळत असेल तर माझ्या निष्ठा.... नाही तर िनसटतोय.... आय.पी.एल.वाल्याचे काय? तेही तसेच. लखनौकडून खेळणारा िक्लंटन डी. कॉक गेल्यावेळी आय.पी.एल. ला मुंबई इंिडयन्स संघाकडून खेळत होता. ज्यात तेवतियाचा गवगवा झाला होता तो गेल्यावेळी राज्ास्थानकडून खेळत होता... आता गुजरात संघातून खेळला. आय. पी. एल. हा पैशांचा बाजार आहे. तिथे खेळाडू विकत घेता येतात.  राजकारणामध्ये खर्च करून विजय िमळवता येतात. आय. पी. एल. आिण राजकारण यात आता फार फरक राहिलेला नाही. दोन्हीकडे िफक्सिंग आहेच. आिण दोन्हीकडे ते उघड आहे. कोणी कोणाला हसायचे....? कोणी कोणाला टाळ्या मारायच्या.... ?

आता राज्यसभेची निवडणूक आहे.... सहा जागांसाठी ७ उमेदवार... पण चर्चा घोडेबाजाराची आिण तीही उघडपणे. कोणाला कशाचे काहीच वाटेनासे झाले आहे. सामान्य माणसांच्या कोणत्याही प्रश्नांबद्दल ना नेत्यांना आत्मियता राहिली ना वृत्तपत्रांंना... विधानसभा चालवायला अध्यक्ष लागत नाही, हे आपण सिद्ध केले. वृत्तपत्र चालवायला चांगले जाहिरात डिपार्टमेंट असले की, ते चालते. संपादकाची गरज नाही, हे ही सिद्ध केले. संपादकाच्या नावामुळे कोणीही वृत्तपत्र विकत घेत नाही. इंिडया नावाचे एक चॅनल आहे... २४ तास ज्ञाानव्यापीवरती चालते आहे. ितथे असलेल्यांना ‘पद्मश्री’ मिळते. फार योजनाबद्धरितीने हे सगळे घडून येत आहे. देशाच्या सामान्य माणसांच्या मुख्य प्रश्नांपासून सगळेच भरकटलेले आहेत. केंद्र सरकारबद्दल बोलायलाच नको... त्यांच्या हातात ईडी, बीडी, सीडीचे आसूड आहेत. राज्य सरकार घोषणाबाजी, पेपरबाजी यावरच चाललेले आहे. 

पूर्वी विरोधी पक्ष जागरूक होता. लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरत होता. आता जे विरोध करतील, ते लगेच मॅनेज होतात. त्यामुळे राजकारणातही आय. पी. एल. आहेच. आिण ते उघड आहे. सामान्य माणसांचा प्रश्न घेवून आता उभा राहणारा उमेदवार कोण? बोलणारा कोण? लिहीणारा कोण? लाखोंचा मोर्चा काढू शकणारा आता नेता कोण? ही भाव वाढ आम्ही चालू देणार नाही. ‘ही भाववाढ’ सहन करण्यापलिकडची आहे, असे म्हणून सामान्य माणसांच्या प्रश्नांवर जीव पणाला लावणारा कोण?  लाखांचा माेर्चा काढणारे आज नेतेच नाहीत. उद्धवराव नाहीत, एन. डी. नाही, तिकडे विदर्भात जांबुवंतराव नाहीत, पत्रकारांमध्ये आचार्य अत्रे नाहीत... 

सामान्य माणसांच्या प्रश्नांचा आवाज बुलंद करणारे शाहीर अमरशेख नाहीत. महागाईवर गृहिणींना जागे करणाऱ्या मृणालताई, अहिल्याताई नाहीत.... सामान्य माणसे वाऱ्यावर अाहेत. त्याचे कोणाला काहीही पडलेले नाही. आय.पी.एल. जेवढी फसवी, जेवढी पैशांच्या भोवती फिरणारी, तेवढेच आजचे राजकारण भावनात्मक प्रश्न तापवून सामान्य माणसांना मूर्ख बनवणारे. पैशांभोवतीच फिरणारे... ज्यांच्याजवळ पैसा आहे... असे  आमदार पक्ष बदलून लगेच आपापली कार्यालये थाटून बसतात. वाढिदवसाला मिरवतात. पण या देशाला घडवणाऱ्या, देशाची बांधणी करणाऱ्या फार मोठ्या मोठ्या नेत्यांच्या वाढदिवसाची आठवण एकाही पुढाऱ्याला होत नाही... एकाही राजकीय पक्षाला होत नाही. 

अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होते, हा भाग वेगळा... श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देवून देशासाठी खूप मोठी गोष्ट केली. पण आता वाजपेयींच्या उंचीचा माणूस भाजपामध्ये कोण आहे? या महान शास्त्रज्ञााच्या जयंतीचा फलक लावावा, असे कोणत्याच राजकीय पक्षाला का वाटत नाही?  सर होमी भाभा, सतिश धवन, विक्रम साराभाई या महान शास्त्रज्ञाांनी देशाच्या ज्ञाान-विज्ञाानाची बांधणी केली. नवीन िपढीला ही माणसं समजावीत, असा प्रयत्न कोणता राजकीय पक्ष करतोय? महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष पैेसेवाले आहेत. महर्षी विठ्ठल रामजी  शिंदे, धोंडो केशव कर्वे या महान शिक्षणशास्त्रज्ञाांची आठवण कोणत्याच राजकीय पक्षाला का होत नाही? ७ ते ८ लाख विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या  रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीला, रयत संस्था सोडली तर, महाराष्ट्रभर भाऊरावांचा फोटो लावावा, त्यांचे काम नवीन िपढीला सांगावे, असे कोणत्याच राजकीय पक्षाला का वाटत नाही? 

याचे कारण अगदी उघड आहे. या महान व्यक्तीमत्त्वांच्या पासून राजकीय फायदा काही नाही... मग कशाला खर्च करायचा? सगळं गणित फायद्याशी आिण पैशांशी आहे. छत्रपती िशवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार होतो... त्यांचे फलक लागतात, बॅनर उभे राहतात... पण छातीवर हात ठेवून सांगा.... त्या सगळ्यामागे त्यांच्या महान प्रतिमांचा राजकीय फायदा घेण्याची भावना असते की नसते? १०० टक्के असते. काही वेळा मनात येवून जाते... ही माणसं आज पुन्हा िजवंत झाली आिण िनवडणुकीला उभी राहिली... त्यांनी ठरवलं... एकही पैसा खर्च न करता मी िनवडणूक लढवीन... तर भिती अशी वाटते की, ही महान माणसंसुद्धा पराभूत होतील! उद्या महात्मा गांधीही िनवडणुकीला उभे राहिले तर त्यांचाही पराभव होवू शकतो! डॉ. बाबासाहेबांचाही पराभव याच महाराष्ट्रात झालाच होता ना... तेव्हा पैशांचे एवढं राजकारण नव्हतं. पण आता सर्व राजकारण पैशानं नासवले आहे. आय. पी. एल. असो नाही तर राजकारण असो, सगळ्े काही पैाशांवर आहे. आिण ते अगदी उघडपणे आहे. 

शेवटचा मुद्दा... महाराष्ट्र काँग्रेसचे िशर्डी येथे िचंतन शिबीर बुधवारपासून सुरू अाहे... गुरुवारी हा लेख लिहीतो आहे... २५० ची काँग्रेस कार्यकारिणी... यातील प्रत्येकाला विधानसभेचे तिकीट हवे आहे. महाराष्ट्र विधानसभा काँग्रेस पक्षातून िनवडून येणारी राज्यसभेची एकमेव जागा कोणा शायर प्रताप गढीला दिली म्हणतात. महाराष्ट्रात काय संदेश गेला....?  महाराष्ट्र काँग्रेसला राज्यसभेत आवाज उठवणारा एकही मराठी नेता सापडला नाही  का?....  तिकडे शिवसेनेने सलग तीन वेळा खासदार केलेल्या, १८ वर्षांत महाराष्ट्रासाठी या खासदाराने राज्यसभेत िकती वेळा आवाज उठवला, िकती प्रश्न लावून धरले... हा विचार गौण मानून संजय राउत यांना चौथ्यांदा उमेदवारी िदली. 

काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याच्या मागे, नेत्याच्या मागे श्रेष्ठी असे ठामपणे उभे राहत नाहीत. म्हणून गढी यांना ितकीट देण्याचे प्रताप घडतात. हे िनर्णय कोण ठरवतं, हेच समजत नाही. समजा श्रेष्ठींनी ठरवले तर, त्यांना स्पष्टपणे सांगून, याचे काय परिणाम होतात असे बोलणारा एकही मायेचा लाल महाराष्ट्र काँग्रेसकडे नाही का?  की या नेत्यांची श्रेष्ठींकडे पत नाही? पंजाबमध्ये चुकीचा िनर्णय केला. कॅप्टनला बदलले... राज्य घालवले. सगळीच भूमिका चुकतेय... महाराष्ट्रात सत्तेच्या लोभातून आधी बाहेर पडा... लोक काँग्रेसच्या बरोबर असले तरी नेते कुठे आहेत? परवा विलासरावांची ७७ वी जयंती झाली. त्यािदवशी वाटले.... ‘आज विलासरांवांसारखा नेता नाही.... म्हणून काँग्रेसवर ही वेळ आली... ’ राष्ट्रवादीचे बघा... ८२ व्या वर्षी शरद पवार संपूर्ण उन्हाळ्यात ४५ ते ४८ तापमानात, नांदेडपासून, बबनराव ढाकणेंच्या पाथर्डीपर्यंतच्या कार्यक्रमांना सतत िफरत आहेत. 

पण ज्या गावात जातील ितथे आधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेळ देतात. थेट भेटता येते, फोन करा... निरोप ठेवा...पवारसाहेब घरी नसतील तर रात्री उिशरा त्यांच्याकडून फोन येणार... काम काय ते विचारणार... आज महाराष्ट्र काँग्रेसम्ाध्ये, बाळासाहेब थोरात सोडले तर ही स्थिती अिजबात नाही. मंत्र्यांना फोन करा... िजल्हाध्यक्षांचे फोन  उचलत नाहीत... तुमचं -आमचं काय घेवून बसलात... त्यामुळे लोकांपासून पक्ष खूप दूर गेला. नेत्यांची गर्दी झाली... प्रत्येकाला कार्यकारिणी हवी... मग ितकीट हवं... मग मंत्रीपद हवं... राजकीय हाव कमी झाल्यािशवाय महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा उभी राहणे फार अवघड आहे... गांधीना एका गोळीने मारता आले... गांधी विचार गोळीने मारता येत नाही. पण हा विचार आिण झेंडा खांद्यावर घेवून गावागावात जाणारे आहेत कुठे? सगळ्यांची गर्दी सत्तेभोवती आहे. सगळ्या देशाचे हेच िचत्र आहे... पैसेवाली आय. पी. एल. आिण दुसरीकडे पैशांचे राजकारण.... फार फरक नाही.... 

- मधुकर भावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.