Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसांसह नागरिकांचे लाडके जिल्हा पोलिस प्रमुखः दीक्षित गेडाम

पोलिसांसह नागरिकांचे लाडके जिल्हा पोलिस प्रमुखः दीक्षित गेडाम


सांगलीकरांकडून गेडाम यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वषार्व


सांगली: पोलिस अधिकारी, कमर्चाऱ्यांचे हित जपणारे, खऱ्या अथार्ने त्यांचे कल्याणकतेर् असणारे आणि सांगलीकरांचे लाडके जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांचा आज वाढदिवस. सांगलीकरांना रात्रीची सुरक्षित सांगली, गुन्ह्यांची तातडीने उकल, चोरीला गेलेला ऐवज परत देणारे जिल्हा पोलिस प्रमुख अशी गेडाम यांची दीड वषार्त ओळख निमार्ण झाली आहे. केवळ दीड वषार्च्या काळात गेडाम यांनी सांगलीकरांच्या मनात विशेष आदर निमार्ण केला आहे. आज त्यांच्या वाढदिनी सांगली दपर्णने त्यांनी केलेल्या कामांचा घेतलेला धावता आढावा...

सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून दीक्षित गेडाम यांनी कोरोनाकाळात कायर्भार घेतला. कोरोनाशी लढा देत त्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकडे विशेष लक्ष दिले. कोरोना काळात पोलिसांची नियमित आरोग्य तपासणी, कोरोनाने मृत झालेल्या पोलिस कुटुंबियांना तात्काळ दिलेली मदत यामुळे त्यांनी अल्पावधीतच अधिकारी आणि कमर्चाऱ्यांमध्ये नावलौकिक मिळवला. जिल्हा पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक वाहने, यंत्र सामग्री यासाठी त्यांनी केलेले विशेष प्रयत्न यामुळेच आज सांगलीकर सुरक्षित आहेत. पोलिस पाल्यांसाठी त्यांनी कॅंपस इंटरव्ह्यूचेही आयोजन केले होते. त्यातून नियुक्ती झालेल्या पाल्यांना पालकमंत्र्यांच्याहस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.  

डायल ११२ द्वारे त्यांनी नागरिकांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिला, युवतींना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. या क्रमांकावर फोन केल्यावर केवळ दहा मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल होत आहेत. गेडाम यांनी राबवलेल्या आणखी एक चांगला उपक्रम म्हणजे चोरीला गेलेला ऐवज संबंधितांना परत देण्याचा. गेल्या दीड वषार्च्या काळात शेकडो लोकांना कोट्यवधी रूपयांचा ऐवज जिल्हा पोलिस दलाने परत दिला आहे. त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोका, स्थानबद्धता, तडीपारी अशा कारवाया करून गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळवले आहे. अवैध व्यावसायिकांवरही तडीपारीची कारवाई करून त्यांना सळो की पळो करून सोडले आहे. एकंदरीत दीड वषार्त जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी स्वतःची वेगळी ओळख निमार्ण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली दपर्ण परिवाराकडून त्यांना हादिर्क शुभेच्छा तसेच त्यांच्या पुढील कारकीदिर्सही शुभेच्छा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.