Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वंजारवाडीच्या धाब्यावर वेटरचा गळा चिरून खून

 वंजारवाडीच्या धाब्यावर वेटरचा गळा चिरून खून


दुसऱ्या वेटरचे कृत्य : किरकोळ वादातून चाकूने गळा चिरला

तासगाव : तासगाव - विटा रस्त्यावरील वंजारवाडी हद्दीतील दोस्ती धाब्यावर एका वेटरने दुसऱ्या वेटरचा चाकूने गळा चिरून खून केला. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सुशांत बजरंग जगताप (रा. बस्तवडे, ता. तासगाव) याला अटक करण्यात आली आहे. तर हणमंत श्रीरंग पिसाळ (रा. बावधन, वाई) असे मयताचे नाव आहे. या खुनाच्या घटनेने तासगाव तालुक्यात एकचं खळबळ उडाली आहे. तासगाव पोलिसात या घटनेची नोंद आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव - विटा रस्त्यावर वंजारवाडी हद्दीत दोस्ती ढाबा आहे. या धाब्यावर सुशांत  जगताप व हणमंत पिसाळ हे दोघेही वेटर म्हणून गेले काही महिने काम करीत होते. दोघांचे काम चांगले होते. मात्र कामाच्या किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद व्हायचे मात्र काही वेळानंतर ते व्यवस्थित होत असत. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये काहीतरी किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेला. एकमेकाना शिव्या देत प्रकरण  हातघाईवर येत वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. एकमेकाला हातानी व लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू झाली. वाद वाढत गेला. यावेळी रागाच्या भरात असलेल्या जगताप याने पिसाळ याचा ढाब्यातील कांदा कापन्याच्या चाकूने गळा चिरला. या घटनेने खळबळ उडाली.

यानंतर गंभीर जखमी अवस्थेत हणमंत पिसाळ याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पिसाळ याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जगताप याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. अधिक तपास तासगाव पोलीस  करीत आहेत.➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.