Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांची मनपाच्या डिजिटल क्लासरूमला भेट..

शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांची मनपाच्या डिजिटल क्लासरूमला भेट..


: आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे केले कौतुक


सांगली: कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांची महापालिकेच्या शाळा क्रमांक 1 मधील  डिजिटल क्लासरूमला सदिच्छा भेट दिली. यावेळी क्लासरूम पाहून मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संकल्पनेचे कौतुकही केले. 

     महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून मनपा शाळा क्रमांक 1 मध्ये पहिली डिजिटल क्लासरूम साकारण्यात आली आहे. यामध्ये महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाबरोबर आधुनिक संगणक प्रणालीचेही शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अप्रोचकडून सर्व साहित्य आणि यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अद्यावत डिजिटल क्लासरूममुळे मनपा शाळेतील मुलं शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे. 

आज या डिजिटल क्लास रूमला कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे यांनी आज भेट देत या डिजिटल क्लास रूममधील मुलांशी संवाद साधला. तसेच आयुक्त नितीन कापडणीस यांनी जी संकल्पना राबवित महापालिकेच्या शाळांना उभारी आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि यातूनच उभारलेली डिजिटल क्लासरूम नक्कीच मनपा शाळांच्या मुलांना शैक्षणीक दृष्ट्या बळकट करण्यासाठी फार उपयोगी ठरणार असल्याचे मत चोथे यांनी यावेळी काढीत आयुक्त कापडणीस यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, कनिष्ठ अभियंता महेश मदने, मनपा शिक्षण मंडळाचे लेखापाल गजानन बुचडे, मुख्याध्यपिका मीना ऐतवडे आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.