Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली शहरात महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या माता रमाई आंबेडकर उद्यान

सांगली शहरात महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या माता रमाई आंबेडकर उद्यान 


सांगली शहरात महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या माता रमाई आंबेडकर उद्यान येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्याकरिता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.भिमराव यशवंत आंबेडकर आज सांगली येथे आले होते.

 नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी या उद्यानात होत असलेल्या प्रकल्पांची  माहिती मा.भिमराव आंबेडकर यांना दिली. सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उद्यानाची निर्मिती होत आहे.या उद्यानाचे काम सुरु आहे.या कामाची पाहणी आज मा.भिमराव आंबेडकर यांनी केली. यावेळी माता रमाई आंबेडकर उद्यान येथे भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते बुद्धा बांबू या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.


या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक प्रा.गौतमीपुत्र कांबळे,समाजकल्याण समितीचे सभापती पै.सुब्राव मद्रासी,किरणराज कांबळे, नितीन गोंंधळे,प्रा.रविंद्र ढाले,हणमंत साबळे,श्रीशैल चवडीकर,रुपेश तामगांवकर,पारमित धम्मकिर्ती,शिवाजी वाघमारे,शहाजी मोरे,हरिभाऊ सवणे,आशा साबळे,छाया कांबळे,गंगा बनसोडे,मालन नागराळे,प्रा.भारत ऐवळे,अमिता कांबळे,प्रियानंद कांबळे, सुशांत कांबळे,रमेश सावंत,मिलिंद साबळे,सुरेश कुरणे,सुजित लोखंडे,नितीन माने,गीता कांबळे,शरद रणखांबे,संतोष सरवदे,शिवाजी वाघमारे,राजेंद्र रणखांबे, कुमार पवार यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे संयोजन अरुण आठवले,प्रफुल्ल ठोकळे,अजय उबाळे,बापू ठोकळे,नितीन साबळे,अविनाश कांबळे,जितेंद्र बनसोडे,सुशांत कांबळे,ऋषिकेश बनसोडे,किशोर सूर्यवंशी,गजानन कांबळे,नितीन कांबळे यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.