Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या खणभाग वडर गल्लीतील धोकादायक घर महापालिकेकडून निष्काशीत करण्यात आले.

सांगलीच्या खणभाग वडर गल्लीतील धोकादायक घर महापालिकेकडून निष्काशीत करण्यात आले.


सांगलीच्या खणभाग वडर गल्लीतील धोकादायक घर महापालिकेकडून निष्काशीत करण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नितीन शिंदे यांनी ही कारवाई केली. 

प्रभाग 16 मधील खणभाग वडार गल्लीतील कलगुटगी यांचे घर गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होते. यामुळे हे घर धोकादायक बनले होते. याबाबत महापालिका प्रशासनाने घोकादायक घर उतरवून घेणेबाबत नोटीस सुद्धा बजावली होती. मात्र संबंधित घर मालकानी धोकादायक घर उतरवले नाही. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते. तसेच संभाव्य पावसाळ्यात हे घर पडून दुर्घटना सुद्धा घडण्याची शक्यता होती.


त्यामुळे आज सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे, कनिष्ठ अभियंता ऋतुराज यादव आणि स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे यांच्या पथकाने कलगुटगी यांचे धोकादायक बनलेले घर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार निष्काशीत केले.  याचबरोबर मनपाक्षेत्रात ज्या ज्या इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या आहेत मात्र अद्याप जागा मालकांनी त्या उतरवल्या नाहीत अशा इमारत धारकांनी त्या धोकादायक घर किंवा इमारती स्वताहून उतरवून घ्याव्यात अन्यथा महापालिका प्रशासन आशा इमारती निष्काशीत करेल असा इशाराही सहायक आयुक्त नितीन शिंदे यांनी दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.