Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रात्रीच्या वेळी तुमच्या बाईकवर कुत्रा कधीही भुंकणार नाही

 रात्रीच्या वेळी तुमच्या बाईकवर कुत्रा कधीही भुंकणार नाही


मुंबई : आपल्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाने हे पाहिलं असेल की, सहसा रात्रीच्यावेळी बाईकवाल्यांच्या पाठी कुत्रे लागतात. परिणामी छोट्या-मोठ्या अपघाताला लोक बळी पडतात. तुम्ही देखील रात्रीची गाडी चालवताना असा अनुभव नक्कीच घेतला असणार. रात्रीच्या वेळी जेव्हा ते कुत्रे असतात, अशा रस्त्यावरून जातात तेव्हा ते कुत्रे दुचाकीवर भुंकतात आणि त्याचा पाठलाग करतात. खरंतर कुत्रे मागे लागले की, लोक जोरदार गाडी पळवतात, परंतु याशिवाय या परिस्थीला कसं हाताळायचं हे अनेकांना माहिती नसते. तर आज आम्ही अशाच काही युक्ती सांगणार आहोत, ज्याचा वापर जर तुम्ही केलात, तर तुमच्यापाठी कधीही कुत्रे लागणार नाहीत.

कुत्र्यांना बाईकचा पाठलाग करण्यापासून आणि भुंकण्यापासून कसं थांबवायचं?

खरं तर एक मार्ग आहे, ज्याचा अवलंब करून तुम्ही कुत्र्यांना भुंकण्यापासून आणि दुचाकीवरून पाठलाग करण्यापासून रोखू शकता. ही एक मानसशास्त्रीय युक्ती आहे. तुम्ही कधी याबद्दल नीट विचार कराल, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की, तुम्ही हायस्पीड बाईकवर असता तेव्हाच कुत्रे तुमच्यावर भुंकतात आणि तुमचा पाठलाग करतात. कारण त्यांना धावणारी गोष्ट पकडायची आहे.

परंतु तुम्ही जर त्याच्या उलटे केले, म्हणजे तुम्हाला वाटेत कुत्रा दिसला, तर तुमची बाईक स्लोकरा आणि मग तेथून जा, असं केल्याने कुत्रा तुमच्या मागे लागणार नाही. शिवाय तुम्ही कुत्र्यांकडे पाहू नका, म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, म्हणजे ते तुम्हाला घाबरवण्याचा किंवा तुमच्यावर भुंकण्याचा प्रयत्न करणार नाही. याशिवाय गरज भासल्यास मोटारसायकल थांबवून हळू हळू त्या मार्गावरून पुढे जा. असे केल्याने तुम्हाला दिसेल की, कुत्रे तुमच्यावर भुंकणे बंद करतील. मग थोडं पुढे गेल्यावर तुम्ही दुचाकीवरुन तुमच्या स्पीडने जाऊ शकता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.