Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधानांना मोठा दिलासा; मोदींविरोधातील ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 पंतप्रधानांना मोठा दिलासा; मोदींविरोधातील ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली


नवी दिल्ली 24 जून : गुजरात दंगल प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

गुजरात दंगलीप्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली. भाजपची पडद्यामागची बॅटिंग संपली, आता थेट मैदानात, प्रदेशाध्यक्ष मोर्चेबांधणीसाठी गुवाहाटीत, पुढची रणनीती तयार सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका कायम ठेवण्यायोग्य नसल्याचं म्हटलं आहे. SIT चा 2012 चा अहवाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे.

न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.गोध्रा हत्याकांडानंतर जातीय दंगली भडकवण्याचा कोणताही मोठा कट असल्याचा अहवाल एसआयटीने नाकारला होता. गुलबर्गा सोसायटी दंगलीत काँग्रेस नेते एहसान जाफरी यांची हत्या झाली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.