Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माथाडी, सुरक्षा रक्षक मंडळाची पोलखोल भाग—३

माथाडी, सुरक्षा रक्षक मंडळाची पोलखोल भाग—३


त्या निवृत्त अधिकाऱ्याला मिळतो तीन जिल्ह्याचा पगार 


सांगली: सांगली जिल्हा माथाडी तसेच सुरक्षा रक्षक मंडळाचा सध्याचा प्रभारी निरीक्षक केवळ सांगलीच नाही तर कोल्हापूर, रत्नागिरी येथील मंडळांचाही प्रभारी असल्याने त्या निवृत्त अधिकाऱ्याला तीन जिल्ह्याच्या प्रभारी पदाचा पगार मिळतो.  संबंधित अधिकारी २०१७ मध्ये निवृत्त झाला. त्यानंतर त्याला पुन्हा या दोन्ही मंडळाच्या निरीक्षक पदाचा कायर्भार देण्यात आला. दरम्यान २०२० मध्ये माथाडी कामगार संघटनांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर राज्यातील माथाडी मंडळाच्या प्रभारी पदाचा कायर्भार निवृत्त अधिकाऱ्याकडे देऊ नये असा शासनाने निणर्य घेतला आहे.   

राज्य शासनाने निवृत्त अधिकाऱ्याबद्दल घेतलेल्या निणर्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून त्या मंडळाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. मात्र सध्या हा अधिकारी सांगली-सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक मंडळाचा निरीक्षक म्हणून काम करत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याला या तीन जिल्ह्यांचा पगार अदा केला जात आहे. निवृत्त अधिकाऱ्याकडे हा पदभार देण्याचे कारण काय असा प्रश्न सुरक्षा रक्षकांकडून विचारला जात आहे. दरम्यान गेल्या पाच वषार्पासून केवळ या एकाच अधिकाऱ्याला तीन जिल्ह्याचा पदभार देण्यामागे कोणाचा हात आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही सुरक्षा रक्षकांकडून केली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.