Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मतदार ओळखपत्र आधारशी लिंक होणार; 1 ऑगस्टपासून राज्यात मोहीम सुरू होणार

 मतदार ओळखपत्र आधारशी लिंक होणार; 1 ऑगस्टपासून राज्यात मोहीम सुरू होणार


मुंबई : आधार कार्ड आणि पॅन कार्ड परस्परांशी संलग्न झाले असतानाच आता आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राची जोडणी केली जाणार आहे. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यभर 1 ऑगस्टपासून ही प्रकिया सुरू केली जाणार आहे.

मतदारयादीत दुबार नावे असणे, पत्ता अपूर्ण असे अनेक दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्वभूमीवर आता मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. एकाच व्यक्तचे एकापेक्षा अधिक मतदार संघात किंवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी आहे का हे तपासण्यासाठी आधार क्रमांकाची जोडणी उपयुक्त ठरणार आहे.

श्रीकांत देशपांडे म्हणाले, उद्या सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांना नवीन बदलांची माहिती देण्यात येणार आहे. कोणताही आधार क्रमांक, पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. आधार क्रमांक डिजिट्सला मास्किंग केले जाणार आहे. सारखे फोटो असणारे फोटो शोधण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत 40 लाख व्हेरिफिकेशन करण्यात आले आहे. मतदार यादीत 20 लाख बनावट नावे आढळली आहेत.

एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्या शहराच्या मतदार यादीत आहे. पण बराच काळ दुसऱ्या शहरात राहत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे त्याचे नाव दुसऱ्या शहरातील मतदार यादीतही समाविष्ट होते. अशा स्थितीत दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत त्याचे नाव कायम आहे. एकदा आधारशी लिंक केल्यानंतर मतदाराचे नाव मतदार यादीत एकाच ठिकाणी असेल. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला फक्त एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे.






➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.