Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य...

 महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य...


मुंबई : 'महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असे वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत अंधेरी येथे दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण आणि उदघाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार नवनीत राणा आणि भाजपचे आमदार नितेश राणे सुद्धा हजर होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, 'मी अनेक जणांना सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती लोकांना काढून टाका किंवा राजस्थानी लोकांनाही काढू टाका, जर गुजराती आणि राजस्थानी लोक सोडून गेले तर तुमच्याकडे कोणतेच पैसे उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही.' संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 जणांनी आपलं हुतात्म देऊन मुंबई ही महाराष्ट्राला मिळवून दिली. मुंबईही मराठी माणसांचीच असे अभिमानाने सांगितले जाते. मात्र, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांचे हे पहिलेच वादग्रस्त वक्तव्ये नाही तर या अगोदरसुद्धा वक्तव्ये करून वाद ओढून घेतला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.