Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात पावसामुळे हाय टेन्शन वायर कोसळली; वायरखाली अडकून भाजीविक्रेत्या तरुणाचा मृत्यू

 पुण्यात पावसामुळे हाय टेन्शन वायर कोसळली; वायरखाली अडकून भाजीविक्रेत्या तरुणाचा मृत्यू


पुणे : शहरातील नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रोड) असणाऱ्या दत्तवाडी येथील सवाई हॉटेलजवळ महावितरणची हाय टेन्शन वायर पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहित संपत थोरात (वय २०) असं या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

रोहित थोरात हा भाजीविक्रेता असून तो सकाळी दूध घेण्यासाठी जात असताना ही घटना घडली. महावितरणकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून विजेच्या धक्क्याने या तरुणाचा मृत्यू झाला आहे का? याची चौकशी केली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, दत्तवाडी येथील सवाई हॉटेल चौकात हाय टेन्शन वायर तुटून पदपथावर पडल्याचे मेसेज सकाळपासून समाजमाध्यमात फॉरवर्ड केले जात होते. शहरात मुसळधार पाऊस सुरू असून त्याचा मोठा फटका वीजयंत्रणेला बसला आहे. झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्याने वीजवाहिन्या तुटण्याचे प्रकार घडत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मराठवाड्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुणे जिल्ह्यात चार प्रमुख धरणांच्या परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. मागील महिन्यात पावसाने ओढ दिल्याने कोरडी पडलेली धरणे भरू लागली असून, ८.१९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत अवघा ०.४७ टीएमसी पाणी कमी आहे. त्यातच आता खडकवासला धरण सुमारे १०० टक्के भरले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलगा अचानक गेल्याने थोरात कुटुंबाला शॉक बसला आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात काम पोलिसांकडून सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.