Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत एकाचा निघृर्ण खून

सांगलीत एकाचा निघृर्ण खून...



विश्रामबागमधील ८० फुटी रस्ता परिसरातील पहाटेची घटना


सांगली : शहरातील विश्रामबाग येथील ८० फुटी रस्ता परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर एकाचा डोक्यात दगड घालून निघृर्ण खून करण्यात आला. सोमवारी पहाटे ही घटना घडली. दिलीप प्रभाकर शिरगुडकर (वय ४२, रा. सिद्धेश्वर टॅवर, ८० फुटी रस्ता, विश्रामबाग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.   

विश्रामबाग येथील ८० फुटी रस्ता परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर एक मृतदेह पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर एलसीबी तसेच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी एका बुलेट (एमआरएक्स १४२) पडलेली आढळून आली. दिलीपच्या डोक्यात दगड घातल्याचेही स्पष्ट झाले. यामध्ये त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सांगली सिव्हीलमध्ये हलवला आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.