Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष पदी रावसाहेब पाटील तर कोल्हापूर विभागीय सेक्रेटरीपदी प्रा. एन.डी.बिरनाळे यांची निवड..

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष पदी रावसाहेब पाटील तर कोल्हापूर विभागीय सेक्रेटरीपदी प्रा. एन.डी.बिरनाळे यांची निवड.. 


सांगली दि. १७ : दक्षिण भारत जैन सभा, तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी व कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे खजिनदार म्हणून तिसऱ्यांदा फेरनिवड झाली. मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात खा. सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत खा. सुप्रियाताई सुळे यांनी ही निवड जाहीर करुन सप्टेंबर २०२२ मध्ये खा. सुळे यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत होणाऱ्या महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून रावसाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली असून काल त्यांनी तसे पत्र दिले आहे. 

कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी पदी प्रा. एन.डी.बिरनाळे यांची निवड करण्यात आली आहे.  रावसाहेब पाटील हे गेली दोन दशके महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या कार्यात सक्रिय आहेत. ते महामंडळाचे आजीव सभासद असून खजिनदार म्हणून त्यांनी महामंडळाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी चांगले काम केले आहे. ते दक्षिण भारत जैन सभा, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी या संस्थांचे विद्यमान चेअरमन आहेत. 



सप्टेंबर २०२२ मध्ये महामंडळाचे राज्यस्तरीय भव्य अधिवेशन सांगलीत भरविण्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील खासगी शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळाची ५० वर्षापूर्वी वसंतदादा पाटील यांनी स्थापना केली आहे. महामंडळाने गेल्या अर्धशतकी काळात शिक्षण संस्थांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविले असून सध्या संस्थांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महामंडळाच्या अध्यक्षा खा. सुप्रियाताई सुळे व कार्याध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळ अधिक मजबूत करण्यासाठी झटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.प्रा. बिरनाळे हे शिक्षक व शिक्षण संस्था संघटनेत गेली २५ वर्षे सक्रिय असून ते वक्ते आहेत.  या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांतून समाधान व्यक्त करुन  अभिनंदन होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.