Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या

 पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या


मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून देशात पेट्रोल , डिझेलचे दर  स्थिर आहेत. गेल्या 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 22 मे पासून पेट्रोलचा दर प्रति लिटर साडेनऊ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर सहा रुपयांनी कमी झाला. तेव्हापासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे राज्याबाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यात पेट्रोल व डिझेल स्वस्त झाले, मात्र अद्यापही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर हे अधिक आहेत. कच्च्या तेलाच्या दरात चढ उतार सुरू असल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे.

प्रमुख महानगरातील आजचे दर

पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये असून डिझेलचा भाव हा प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

मुंबई - 106.35 94.28

पुणे - 106.10 92.58

नाशिक - 106.22 92.70

नागपूर - 106.65 93.14

कोल्हापूर - 106.02 92.54

दररोज जारी केले जातात दर

पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या दरावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने बदलत असतात. कच्चे तेल स्वस्त झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. तर कच्चे तेल महाग झाले तर पेट्रोल, डिझेलच्या दरात देखील वाढ होते. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर हे दररोज सकाळी जारी केले जातात. भारतात गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.