निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सांगलीत शेकडो नोंदीत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पेटीचे वाटप
त्याप्रसंगी बोलताना निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की,महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांना आजपर्यंत संपुर्ण महाराष्ट्र मध्ये दहा लाखापेक्षाही जास्त बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पेटीचे वाटप करण्यात आलेले आहे. परंतु 31 मार्च 2022 नंतर कामगारांना सुरक्षा पेटी संच देण्याचे कल्याणकारी मंडळाने टेंडर संपल्याने थांबवलेले होते. परंतु बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने मागणी केल्यानंतर 31 मार्च ते 30 जून पर्यंत या टेंडरसाठी मुदतवाढ मिळाल्याने 31 मार्च ते 30 जून पर्यंत ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असेल त्या कामगारांना सध्या सुरक्षा संच पेटीचे वाटप सुरू आहे.
महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने या पेट्या पुढेही पूर्वत सुरू ठेवल्या पाहिजेत असे निवेदन एक महिन्यापूर्वी कामगार मंत्र्यांना देण्यात आले आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारचे सत्तांतर सुरू असल्याने याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.
तसेच बांधकाम कामगारांच्या घरांच्या अनुदान मिळण्यासंदर्भात संपूर्ण माहिती 15 जुलै रोजी अगोदरच जाहीर केल्यानुसार सांगली निवारा भवन येथे मेळावा घेण्यात येणार आहे त्या मिळाव्यास ही बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच सोमवार दिनांक 18 जुलै रोजी बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सचिवांना भेटणार असून सुरक्षा साहित्य संचे पेटीचे वाटप कायमस्वरूपी सुरू ठेवावे अशी मागणी करण्यात येणार आहे. तरी 18 जुलै रोजी ठीक सकाळी 11 वाजता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालय बांद्रा येथे राज्यातील बांधकाम कामगार संघटनांच्या नेत्यांनी व प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांनी पत्रक प्रसिद्ध दिलेले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.