Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज सिव्हीलमध्ये घरापासून दोन वर्षे दूर असलेल्या अनोळखी रूग्णास निशुल्क उपचार देवून स्वगृही पाठविले

मिरज सिव्हीलमध्ये घरापासून दोन वर्षे दूर असलेल्या अनोळखी रूग्णास निशुल्क उपचार देवून स्वगृही पाठविले


सांगली, दि. 28, : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज रूग्णालयात  दि. 16 मे 2022 रोजी मध्यरात्री 70 वर्षे वयाचा अनोळखी पुरूष (सदाशिव गरप्पा कांबळे) जखमी अवस्थेत कर्नाटक राज्यातील कागवाड येथून 108 या रूग्णवाहिकेमार्फत अस्थीव्यंगोपचार कक्षात उपचाराकरीता दाखल करण्यात आला होता. या रूग्णास रूग्णालयाच्या माध्यमातून निशुल्क सेवा देवून दोन महिन्याच्या उपचारानंतर दि. 9 जुलै 2022 रोजी स्वगृही पाठविण्यात आले व तब्बल दोन वर्षापासून ताटसातूट झालेल्या बहीण भावांना मिळविण्याचे काम रूग्णालयाने केले. याकामी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. रूपेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

रूग्णास उजव्या पायास क्रश इंज्युरी झालेली होती. संबंधित विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया केली. कक्षाच्या परिचालकांनी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी रूग्णाची सुश्रुषा केली. दरम्यानच्या काळात समाजसेवा अधिक्षकांनी वेळोवेळी रूग्णाची भेट घेवून मानसीक आधार दिला व नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न केला. समाजसेवा अधिक्षकांच्या भेटीतून रूग्ण हळू हळू मोकळेपणाने बोलू लागला. प्रारंभीक मिळालेल्या माहितीनुसार तो त्याच्या कुटूंबापासून मागील दोन वर्षापासून अलिप्त असल्याचे समजले. तसेच कागवाड परिसरातील मठात राहून भटकंती (भिक्षा) करून चरितार्थ भागवत होता. रूग्णाचे नातेवाईक (बहीण) म्हैशाळ येथे राहत असल्याचे समजले. तसेच रूग्ण दाखल असलेल्या शेजारील खाटावरील रूग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्कातून सदरच्या अनोळखी रूग्णाच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणे सोयीचे झाले. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज तर्फे देण्यात आली. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.