Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजन पाटील भाजपच्या वाटेवर; बळीराम साठेंनाही निमंत्रण..

 राजन पाटील भाजपच्या वाटेवर; बळीराम साठेंनाही निमंत्रण..


साेलापूर : राष्ट्रवादी काॅंग्रसचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनीच या वृत्ताला दुजारा दिला आहे. पाटील यांचे कार्यकर्ते आम्हालाही भाजपत जाऊद्या, असे म्हणतात, असेही साठे यांनी साेमवारी 'लाेकमत'ला सांगितले.

माेहाेळ तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील विरुध्द पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील वाद विकापाेला गेला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या ताेंडावर गावागावात आराेप - प्रत्याराेपांचे घमासान सुरू आहे. राजन पाटील यांच्या विराेधात उमेश पाटील यांची गावागावात माेर्चेबांधणी सुरू आहे. या माेर्चेबांधणीला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सहकार्य मिळत असल्याचा दावा बाळराजे पाटील समर्थक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बाळराजे पाटील यांनी साेशल मीडियावर राष्ट्रवादीला रामराम ठाेकण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दहा दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पाटील पिता - पुत्र भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी राजन पाटील यांना भेटायला या, असा निराेप दिला हाेता. ही भेट झालीच नाही. यादरम्यान साेमवारी पुन्हा बाळराजे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. माेहाेळमधील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले.

एकदाचा साेक्षमाेक्ष करा, राेहित पवारांमार्फत निराेप !

राजन पाटील यांच्यासारखा नेता भाजपत जाणे परवडणारे नाही, असे बळीराम साठे यांनी शरद पवारांना सांगितले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कर्जतचे आमदार राेहित पवार तीन दिवसांपूर्वी अनगर येथे दाखल झाले. राेहित पवार यांनी राजन पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील यांच्यासाेबत चर्चा केली. पक्षाकडून उमेश पाटील यांना ताकद दिली जाते. गावागावात दाेन गट पडले आहेत. आमच्यावर नकाे त्या शब्दात टीका केली जाते. हा विषय यापूर्वीही शरद पवार यांच्या कानावर घातला. त्यांनी कधी अजितदादांना, तर कधी जयंत पाटील यांना भेटायला सांगितले. दरवेळी आम्ही तक्रारी करताे. पुढे काहीच हाेत नाही. ज्यावेळी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील हे तिघेजण एकत्र असतील त्या दिवशी आम्ही येताे. त्याच दिवशी साेक्षमाेक्ष हाेऊ द्या, असा निराेप पाटील पिता - पुत्रांनी राेहित पवार यांना दिला.

आम्ही सत्तेला हपापलेली माणसे नाहीत. पण, आम्ही स्वाभिमानही गहाण ठेवलेला नाही. राजकारणात स्वाभिमान महत्त्वाचा असताे. भाजप प्रवेश वगैरे याबद्दल मला माहिती नाही. याबद्दल नाे काॅमेंट्स.

* राजन पाटील, माजी आमदार.

राजन पाटील पक्षावर नाराज नाहीत. पण मुले नाराज आहेत. ही नाराजी पक्ष प्रमुखांना कळविली आहे. राजन पाटील भाजपत जातील, असे वाटत नाही.

* आमदार यशवंत माने, माेहाेळ.

राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा विषय माझ्याही कानावर आला आहे. शरद पवार यांनी पाटील यांना भेटायला बाेलावले आहे. पण, आता काही गाेष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे आता काही शक्य हाेईल असे वाटत नाही. पण, जे चुकीचे घडतंय त्याबद्दल मी पक्षप्रमुखांना कळविले आहे.

* बळीराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस.

माझ्यावर खापर फाेडू नका : पाटील

माेहाेळ तालुक्यातील राजकीय घडामाेडींसंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी उमेश पाटील यांनीही नुकतीच मुंबईत चर्चा केली. लाेकनेते कारखाना, नक्षत्र डिस्टलरीची प्रकरणे काही लाेकांवर शेकणार आहेत. माझ्यावर खापर फाेडून भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे, असे पाटील यांना जयंत पाटील यांना सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.