Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाबासाहेबांची गाणी लावली म्हणून सरपंचाने केली दलित कुटुंबाला मारहाण

बाबासाहेबांची गाणी लावली म्हणून सरपंचाने केली दलित कुटुंबाला मारहाण


28 जुलै : डीजेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी लावली म्हणून यवतमाळ  जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील कारला इथ एका दलित कुटुंबाला गावच्या सरपंचासह नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

अखेरीस याा प्रकरणी तक्रार केल्यानंतर पुसद ग्रामीण पोलिसांनी 9 जनाविरुद्ध गुन्हा दाखल केला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारला येथील अनुसायाबाई प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीचा विवाह 25 जुलै रोजी आयोजित केला होता. त्या निमित्याने 24 जुलै ला हळदीचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान डीजेवर महापुरुषाचे गाणे सुरू होते.

हे गाणे का लावले म्हणून गावाचे सरपंच रमेश राठोड त्या ठिकाणी आले आणि त्यांनी गाणे बंद करण्यास सांगितले. यावरून सरपंच आणि टाळीकुटे कुटुंबात वाद झाला. त्यानंतर सरपंच यांनी आपल्या काही साथीदारांना घटना स्थळी बोलावले, टाळीकुटे कुटुंबातील महिला आणि पुरुष सदस्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे काही जणांना पाठीवर जखमा ही झाल्या.

तर महिलेला सुद्धा जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार आशाबाई टाळीकुटे यांनी पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरून सरपंच रमेश राठोड यांच्यासह 9 संशयित आरोपी विरुद्ध अॅट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मागील 4 दिवसांपासून सर्व आरोपी फरार असून आरोपींचा शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण? आशा टाळीकुटे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, अनुसायाबाई प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीचा विवाह 25 जुलै रोजी आयोजित केला होता. त्या निमित्याने 24 जुलै ला हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी डीजेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे लावण्यात आले होते. बाबासाहेबांच्या गाण्यावर सर्व जण आनंदाने नाचत होते.

त्याचवेळी सरपंच रमेश राठोड तिथे आला आणि त्याने गाणे बंद करण्यास सांगत जातीवाच शिवीगाळ केली. त्यावर टाळीकुटे कुटुंबीयांनी राठोडला आम्ही गाणे वाजवणाराच तुम्ही इथून निघून जा असा सल्ला दिला. त्यानंतर संतापलेल्या राठोडने आपला मुलगा रमेश, गोविंद, अमोल आणि दयाराम चव्हाण, वाघू चव्हाण, सदानंद राठोड, देऊ राठोड, राजू राठोड, देऊ राठोड लाठ्याकाठ्या घेऊन तिथे पोहोचले आणि सर्वांना बेदम मारहाण केली. एवढंच नाहीतर टाळीकुटे कुटुंबातील महिला आणि मुलींनाही बेदम मारहाण करण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.