Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिंगलयुज प्लास्टिक तपासणीसाठी केंद्रीय पथक सांगलीत

सिंगलयुज प्लास्टिक तपासणीसाठी केंद्रीय पथक सांगलीत


सिंगलयुज प्लास्टिक तपासणीसाठी केंद्रीय पथक सांगलीत: अनेक दुकान , मॉलची , हॉटेल, बेकरीची तपासणी : सहा आस्थापनेकडून 500 किलो सिंगलयुज प्लाटिक जप्त तर 35 हजाराचा दंड वसूल

सांगली: सांगलीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज मनपाक्षेत्रात विविध मॉल, बेकरी , हॉटेल, कोल्ड्रिंक हाऊसची अचानक केली तपासणी केली. यामध्ये या पथकाने सिंगलयुज प्लास्टिकचा वापर असणाऱ्या वस्तूंची पाहणी केली. यावेळी डी मार्ट, एपे बेकरी आणि दुर्गा प्लस्टिक , मोना प्लास्टिक, तसेच आरती प्लास्टिक, संजय डिस्पोझलमधून विक्रीसाठी असणारे सिंगलयुज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले तर या कारवाईत सहा वेगवेगळ्या आस्थापनेकडून 500 किलो सिंगलयुज प्लास्टिक आणि 35 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जुलै पासून सिंगलयुज प्लास्टिक वापर करणाऱ्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्लास्टिक विक्रेत्याकडून सिंगलयुज प्लास्टिकची वापर विक्री होऊ नये याबाबत कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. 


आज सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लॅबोरेटरी हेड अनंता एनएस त्यांच्यासमवेत ज्युनियर लॅबरेटरी असिस्टंट सेंवंशी सूड, प्रदूषण नियंत्रन मंडळ सांगलीचे फिल्ड ऑफिसर रोहिदास मातकर , मनपाचे पर्यावरण अभियंता अजित गुजराती, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी पहिल्यांदा एसएफसी मेगा मॉल, डी मार्ट, एपी बेकरी, गणपती पेठ मधील दुर्गा प्लास्टिक, मोना प्लास्टिक या ठिकाणी अचानक भेटी देऊन तपासणी केली. यावेळी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सिंगलयुज प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य माल पथकाने जप्त करीत 15 हजाराचा दंड केला. या कारवाईत स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, किशोर कांबळे, अंजली कुदळे, कोमल कुदळे, धनंजय कांबळे, गणेश माळी, वैभव कुदळे, नितीन कांबळे , राजू गोंधळे यांच्यासह मनपाचे कर्मचारी सहभागी झाले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.