Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक झटका

 उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक झटका


मुंबई :  आता राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे. शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती आहे. काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका देण्याची सूत्रांची माहिती आहे. याआधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करत आपल्या सोबत सूरतला 20 आमदारांचा गट सोबत नेला होता. यात अपक्ष आमदारही सहभागी होते. त्यानंतर हा आकडा 30 पर्यंत गेला. त्यानंतर ते आसाममधील गुवाहाटीत गेले. त्यानंतर शिंदे गटात शिवसेनेचा एक एक आमदार दाखल होत हा आकडा 39 वर गेला. शिवसेनेतील एकतृतियांश आमदार फुटल्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला. आता शिंदे गटासोबत शिवसेनेचे 40 आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत.

शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाल्याचे समोर आले आहे. आमदारांप्रमाणेच शिंदे गट दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आमदार, नगरसेवकांनंतर उद्धव ठाकरेंना शिंदे आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले. त्यांनी आमदारांसह बंड करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर बंडखोर आमदारांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा सपाटा लावला आहे. आता महानगरपालिकांतील नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यातच आता खासदारांनाही आपल्या गटात खेचण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.