महापालिकेत 'ठायी ठायी विठाई' अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण
सांगली: माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली - आर्ट सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने 'ठायी ठायी विठाई' अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते करण्यात आले.
यामध्ये घेतला पावलांनी वसा यावर नृत्य स्पर्धा, जाऊ शरण कुणा यावर रील स्पर्धा, उभी पंढरी आज नादावली यावर गायन स्पर्धा, रंगू विठ्ठलाचे रंगी यावर पेंटिंग स्पर्धा, बोलावा विठ्ठल, तुका म्हणे यावर निबंध लेखन शब्दांचीच रत्ने यावर कविता स्पर्धा, पाहता लोचन सुखावले यावर फोटोग्राफी स्पर्धा ,चल ग सखे पंढरीला! यावर वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. याचे पारितोषिक वितरण महानगरपालिका मुख्यालय सभागृहात मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरित करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, वॉलचंद कॉलेजचे प्रा. मधाळे सर, आर्टसर्कलचे अध्यक्ष सनराज गांधी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
