सांगलीतील पत्रकार अमित दामले यांचे निधन...
सांगली : शहरातील पत्रकार व छायाचित्रकार अमित रामचंद्र दामले (वय 48, रा. वखारभाग, सांगली) यांचे मंगळवार दि. 12 रोजी सकाळी सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना निधन झाले. ते सांगली शहर ॲम्युच्युअर अॅथलेटिक असोसिएशन या संस्थेचे खेळाडू होते. दै. 'केसरी', दै. 'महासत्ता' दै. 'जनप्रवास' दै. 'प्रतिध्वनी' येथे काही काळ बातमीदार म्हणून ही ते कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
