Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उचगावमध्ये साडेअकरा लाखांची दारू जप्त राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, चौघांवर गुन्हा

उचगावमध्ये साडेअकरा लाखांची दारू जप्त राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, चौघांवर गुन्हाकोल्हापूर:  मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या चौघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 लाख 56 हजाराहून अधिक किमंतीच्या दारूसह दोन वाहनेही जप्त केली. उचगाव (ता. करवीर) येथील महामार्गावर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

रामेश्वर बळीराम हाटवटे, राहूल रणजित जाधव, जीवन केशव प्रधान (तिघे रा. पाचेगाव, ता. गेवराई, बीड) आणि गोपी ऊर्फ गुरूनाथ देवेंद्र चव्हाण (रा. हडपसर, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. उचगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरून दोन वाहनातून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कचे अधीक्षक रविंद्र आवळे यांना मिळाली. त्यानंतर आवळे यांच्या सूचनेनुसार कागल सीमा तपासणी नाका आणि निरीक्षक हातकणंगले यांच्या पथकाने सापळा लावला. कागल ते शिरोलीच्या दिशेने मोटार आणि एक टेंपो संशयास्पदरित्या जात असताना पथकाच्या निदर्शनास आले. त्या दोंन्ही वाहनांना थांबवून त्यामध्ये काय आहे याची विचारणा त्यांनी केली.

संशयितांनी टेंपोत केमिकल असल्याचे सांगितले. त्यानी दाखवलेली बीले व कागदपत्रांचा पथकाला संशय आला. पथकाने दोन्ही वाहनांची तपासणी केली. मोटारीत दारूचे दहा बॉक्स आणि कटर मिळून आले. त्या कटरच्या सहायाने टेंपोच्या शटरचे सील कापून तपासणी केली. प्रथमदर्शनी खोक्यामध्ये द्रव्याने भरलेले कॅन दिसून आले. पण त्याच्या पाठीमागे मद्याचे बॉक्स पथकाला मिळून आले. पथकाने 11 लाख 56 हजार 800 रूपयांच्या मद्यसाठ्यासह दोन वाहने असा एकूण 17 लाख 92 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील, संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक कृष्णांत शेलार, बबन पाटील, जानी मुल्ला, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश लाडके, कर्मचारी मुकेश माळगे, अनिल दांगट, संदीप जानकर, सुभाष कोले, संजय जाधव, धिरज पांढरे, सचिन लोंढे, सागर शिंदे, विशाल आळतेकर, साजिद मुल्ला आदींनी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.