Breaking News

    Loading......

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठविल्या

 मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठविल्या


भारतीय सीमेवर रात्रंदिवस पहारा देऊन देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थीनीं कडून राख्या पाठविण्यात आल्या सदरच्या राख्या शाळेच्या आई पर्वती हॉलमध्ये एका कार्यक्रमात सांगली जिल्हा पोलीस प्रमुख श्री दिक्षित कुमार गेडाम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

सदरच्या वैशिष्ट्यपूर्ण राख्या या आशादीप विशेष शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस प्रमुख श्री दिक्षित कुमार गेडाम हे उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व प्रसिद्ध धनवंत्री डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी डॉक्टर विनोद परमशेट्टी, आशादीप विशेष शाळेचे डायरेक्टर फादर अनिश, मुख्याध्यापिका सतनामकौर चड्डा, चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नंदकुमार चव्हाण, प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण, मुख्याध्यापक एम जी अग्रवाल, एनसीसी अधिकारी अमित नाईक, कौसर फकीर, नचिकेत भोई, माजी विद्यार्थी संघटनेचे डॉक्टर विकास पाटील, डॉक्टर सूर्यकांत व्हावळ डॉक्टर, रंजीत चिडगुपकर, प्रभात हेतकाळे, अतीश अग्रवाल, बाळासाहेब लिपाने-पाटील, मंदार वसगडेकर, प्रकाश भंडारे, रमेश पाटील व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन बॉर्डरवर सहाशे राख्या पाठवण्यात आलेले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.