Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंदोरमध्ये पुलाचे रेलिंग तोडून दुधडी भरून वाहणाऱ्या नर्मदा नदीत बस कोसळली...

इंदोरमध्ये पुलाचे रेलिंग तोडून दुधडी भरून वाहणाऱ्या नर्मदा नदीत बस कोसळली...


इंदूर : मध्यप्रदेशातील इंदोरहून अमळनेर मार्गस्थ होत असलेली बस (एम.एच. -40 – 9848) थेट  नर्मदा नदीत कोसळल्याची घटना सोमवारी सकळी घडली आहे. खळघाट येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे रोलिंग तोडून बस नदीत कोसळली

आहे. या दुर्घटनेत 15 ते 20 जण हे वाहून गेले आहेत. तर काहींना पोहत नदीचा किनारा गाठला आहे. महाराष्ट्र रोडवेजची ही बस असून ती इंदोरहून अमळनेर निघाली असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बचावकार्यास सुरुवात केली आहे. शिवाय खरगोन येथील डीएम आणि पोलीस अधीक्षक यांनीही घटनास्थळी धाव घतेली आहे. नदीतून आतापर्यंत 13 मृतदेह हे बाहेर काढण्यात आले आहेत तर 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे.

अशी घडली दुर्घटना

या घटनेत बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, नर्मदा नदीवरील पुलाची रोलिंग ओलंडताना ही दुर्घटना घडली. एवढेच नाहीतर बस ही नदी लगतच्या खडकावर कोसळून परत नदीत उलटली. या विचित्र अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये बसचा चक्काचूर झाला असून जो तो नदी लगतचा खडकाळ भाग जवळ करण्याचा प्रयत्न करीत होता. शिवाय पोलिसांनी बचाव कार्याला लागलीच सुरवात केली होती. त्यामुळे बचावकार्य संपल्यानंतरच सर्वकाही समोर येणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.