Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नूतन आयुक्त सुनील पवार यांची सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट : कामकाजाची घेतली माहिती

नूतन आयुक्त सुनील पवार यांची सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट : कामकाजाची घेतली माहिती 


सांगली :  महापालिकेचे नूतन आयुक्त सुनील पवार यांनी आज मंगलधाम येथील सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर मध्ये सुरू असणाऱ्या सेवांची माहिती घेतली. तसेच येथील कॅमेराद्वारे पूर पट्ट्यातील भागावर विशेष लक्ष ठेवले जाते तसेच अत्याधुनिक सुविधा असणारे हे सेंटर नागरिकांना आपत्ती काळात मदत करणारे ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

यावेळी उपायुक्त राहुल रोकडे आणि सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांनी आयुक्त सुनील पवार यांचे स्वागत केले. यावेळी बंदेनवाज पिराजादे, सूरज माने, अनिता जाधव, हैदर मुलाणी, ऋषिकेश डुबल, नितीन महापूरे, अंगरक्षक वसीम सय्यद आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.