Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भावाच्या विरोधात रस्त्यावर उतरले प्रल्हाद मोदी, म्हणाले..

भावाच्या विरोधात रस्त्यावर उतरले प्रल्हाद मोदी, म्हणाले.. 


नवी दिल्ली : रेशन दुकानदारांच्या संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत जंतरमंतर येथे धरणे आंदोलन केले त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हेही सहभागी झाले होते. प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे उपाध्यक्ष देखील आहेत. या धरणे आंदोलनाच्यावेळी मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात घोषणाबाजीहीं करण्यात आली.

संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस, विश्वंभर बसू यांनी पीटीआयला सांगितले की आम्ही मोदी सरकारला आमच्या नऊ कलमी मागण्यांचे निवेदन सादर करणार आहोत. त्यासाठी आम्ही बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेण्याचे ठरवले आहे, असे ते म्हणाले.तांदूळ, गहू आणि साखरेच्या नुकसानीची भरपाई सरकारकडून मिळावी, खाद्यतेल आणि डाळींचा रास्त भाव दुकानांमधून पुरवठा करण्यास अनुमती द्यावी, मोफत अन्नधान्य वितरणाचे ‘पश्‍चिम बंगाल रेशन मॉडेल’ देशभरात लागू करावे, अशा या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.

स्वस्त धान्य दुकानदारांचे देणे त्वरीत दिले जावे अशीही त्यांची प्रमुख मागणी आहे. ग्रामीण भागातील रास्त भाव दुकानातील विक्रेत्यांना तांदूळ आणि गव्हाचे थेट खरेदी एजंट म्हणून काम करण्याची परवानगी द्यावी असेही या संघटनेचे म्हणणे आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.