Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

 महापालिकेत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण 


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी माधवराव माने यांच्या उपस्थितीत आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते मनपा मुख्यालय आवारात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनपाचे स्थायी सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सब फायर ऑफिसर सुनील माळी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून संचलन करण्यात आले तर महापालिका कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांनी झेंडा गीत आणि समूव्ह गीत सादर केली. या कार्यक्रमासाठी महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.