मोठी बातमी, मोहित कंबोज..
रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, चर्चांना उधाण
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल ट्विट करुन खळबळ उडवून देणारे भाजप नेते हे यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. तर, फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी या देखील सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. मोहित कंबोज आणि रश्मी शुक्ला हे दोघे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. मोहित कंबोज यांनी काल रात्री सलग तीन ट्विट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती.
मोहित कंबोज यांनी आज आणखी दोन ट्विट करत इशारा दिला होता. तर, २०१९ च्या विधानसभा निवडणूक आणि सत्तास्थापनेच्या दरम्यान फोन टॅपिंग केल्याचा आरोप असणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्यानं भेटीत नेमकं काय चर्चा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी त्यांना महाविकास आघाडी सरकारकडून आरोपी करण्यात आलं होतं. आता शुक्ला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.
आता रश्मी शुक्ला महाराष्ट्रात पुन्हा परत येणार का याबाबत तर्क वितर्क सुरु झाले आहेत. मोहित कंबोज देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला भाजप नेते मोहित कंबोज यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याबद्दल ट्विट केलं. मोहित कंबोज यांनी नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा नेता तुरुंगात जाईल, असा इशारा दिला होता. मोहित कंबोज यांनी त्यानंतर सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी सुरु करण्याची मागणी केली होती. मोहित कंबोज यांनी आज आणखी दोन ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला. नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत, संजय पांडे यांच्यानंतर आणखी एक नेता तुरुंगात जाईल, असा इशारा दिला. मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळं मोहित कंबोज यांच्या ट्वविटची आज दिवसभर चर्चा सुरु होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

