Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर: लाच स्वीकारताना वरिष्ठ महिला अधिकारी अटकेत

कोल्हापूर: लाच स्वीकारताना वरिष्ठ महिला अधिकारी अटकेत


कोल्हापूर, 11 ऑगस्ट : राज्यसेवा किंवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देवून अधिकारी होण्याचं लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. अतिशय मोजके विद्याथी ही परीक्षा पास होतात. त्यामुळे ही परीक्षा पास झाल्यानंतर आपण त्या पदाची जबाबदारीची जाणीव, मर्यादा आणि आदर राखला पाहिजे. कारण खूप खडतर प्रवास करुन आपण त्या पदापर्यंत पोहोचलेलो असतो. विशेष म्हणजे सर्वसामान्य, गरीब जनेतेच्या सेवेसाठी आपण कार्यरत आहोत, ही गोष्ट अधिकाऱ्यांनी विसरायला नको. पण काही अधिकारी विसरतात आणि पैशांच्या लोभापाई नागरिकांना लुबाडण्याचं काम करतात.

सर्वसामान्य नागरिकांचं काम करण्यासाठी त्यांच्याकडून लाच घेतात. पण असं लाच घेणं एका महिला अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. आणि ही अधिकारी म्हणजे साधीसुधी अधिकारी नाही तर मुख्य प्रशासकीय पदावरील महिला अधिकारी आहे. या महिला अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलं आहे.

त्यामुळे महिला अधिकाऱ्याचे कृत्य जगजाहीर झाले आहेत. विशेष म्हणजे राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह आहे. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा केला जातोय. या दरम्यान कोल्हापुरातून अशाप्रकारची बातमी समोर आली आहे.

कोल्हापुरात एक महिला मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाली आहे. भावना चौधरी असं या महिला प्रशासकीय अधिकारीचं नाव आहे. संबंधित महिला अधिकारी ही क्लास वन अधिकारी आहे. पण तरीही या महिलेने अशाप्रकारचं कृत्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महिला अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडे 56 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती. एसीबी अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत कारवाई केली आणि महिला अधिकाऱ्याला अटक झाली. संबंधित महिला अधिकारी भावना चौधरी या कोल्हापूरच्या आरोग्य सेवा मंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत होत्या. तक्रारदार व्यक्तीने त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील 6 लाख 72 हजार रुपये मंजूर करण्यासाठी विनंती केली होती.

पण त्यासाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांनी रकमेच्या 10 टक्के प्रमाणे लाच मागीतली होती. अखेर तडजोडीअंती 5 हजार रुपये देणे निश्चित झालं होतं. तक्रारदार व्यक्तीने महिला अधिकाऱ्यासोबत लाचेबाबत तडजोड करुन 5 हजार रुपये निश्चित केले. त्यानंतर एसीबीकडे तक्रार केली.

त्यांच्या तक्रारीची दखल घेत एसीबी अधिकारी कामाला लागले. त्यांनी सापळा रचला आणि महिला अधिकाऱ्याला रंगेहात लाच घेताना पकडण्याचं ठरवलं. एसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या तयारीनुसार अगदी तसंच घडलं आणि त्यांनी रचलेला सापळा यशस्वी ठरला. एसीबी अधिकाऱ्यांनी महिला अधिकाऱ्याला रक्षाबंधनाच्या दिवशी लाच घेताना रंगेहाथ पकडलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.