🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या पुरपट्ट्यात महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती

 सांगलीच्या पुरपट्ट्यात महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती


सांगली : कृष्णेची पातळी वाढताच खबरदारी म्हणून सांगलीच्या पुरपट्ट्यात महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पुरपट्ट्यात मनपाकडून खबरदारीबाबत प्रबोधन केले जात आहे.


सध्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाकडून नदी काठच्या वस्त्यांना तसेच आस्थापनाना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. आज महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहायक आयुक्त नितीन शिंदे, मुख्य अग्निशमन अधिकाती विजय पवार, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, भालचंद्र कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी सुद्धा महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थलांतर करण्याची तयारी दर्शविली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.