Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पक्षचिन्हाबाबत कोणताही निर्णय घेवू नका

 पक्षचिन्हाबाबत कोणताही निर्णय घेवू नका


मुंबई, दि. 4 : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर आज (दि. ४) पुन्हा सुनावणी झाली. याप्रकरणी आठ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल, तोपर्यंत शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेवू नका, अशी सूचना या वेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली. तसेच हे प्रकरणी पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे देण्याबाबतही आम्ही निर्णय घेवू, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.