गुलाबराव पाटील यांची जयंती काँग्रेस कमिटी व सांगलीतील विविध संस्थांमध्ये साजरी
सांगली, दि. १६: सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांची १०१ वी जयंती जिल्हा काँग्रेस कमिटीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस सुभाषतात्या खोत व सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरूण पळसुले यांच्या हस्ते गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सांगली जिल्हा आज द्राक्ष उत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. गुलाबराव साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक विधायक योजना राबविल्या होत्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या विकासाबरोबरच पुरक व्यवसाय केला पाहिजे. म्हणून त्यावेळचे जिल्हा शेती अधिकारी प्र. शं. ठाकूर यांनी द्राक्ष पिकांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी कर्ज पुरवठयास बँकेला सुचवले. गुलाबराव आणि बँकेच्या अधिकाऱ्यासह बांधावर जाऊन गरजा समजून घेतल्या. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जाद्वारे भक्कम पाठिंबा दिला. त्याचीच गोड फळे आज जिल्हा अनुभवत आहे. अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष अजितराव ढोले, जिल्हा सचिव सचिन चव्हाण, देशभुषण पाटील, विठ्ठलराव काळे, शमशादबी नायकवडी, श्रीधर बारटक्के, सुभाष पट्टनशेट्टी, शिवाजीराव सांवंत, नामदेव पठाडे, जन्नतबी नायकवडी, पैगंबर शेख, विश्वासराव यादव आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगली जिल्हा सहकार बोर्ड येथेही गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी यशवंत माळी, माजी प्राचार्य बी. ए. पाटील, एन. एम. हुल्याळकर, शरद गुरव, अॅड. राजीव लाले, ऋतुराज पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच मोहनरावजी शिंदे नागरी सहकारी पत संस्था मर्या. सांगली येथे सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांच्या जयंती निमीत्त यशवंत माळी अध्यक्ष टिंबर मर्चंट को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सांगली व अँड. राजू लाले संचालक सांगली जिल्हा सहकार बोर्ड, यांचे शुभहस्ते प्रतीमा पुजन करणेत आले. सदर प्रसंगी गुलाबराव पाटील सहकार प्रशिक्षण, केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य बी. ए. पाटील, शरद गुरव महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक व मोहनरावजी शिंदे नागरी सहकारी पत संस्था मर्यादित सांगलीचे चेअरमन एन. एम. हुल्पाळकर व्यवस्थापीका नेहा कुलकर्णी तसेच चैत्राली गुरव, सना पटेल व उज्वला आरवाडे, संजय बिरादार, श्रीकांत लांजेकर व संस्थेचे सभासद सदर प्रसंगी उपस्थित होते. तसेच ग्रामीण भागातही विविध संस्थांमध्ये गुलाबराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.