कडेगावमध्ये लाच घेताना अव्वल कारकून सुनील चव्हाणला अटक
दुसऱ्यांदा सापडला लाचलुचपतच्या जाळ्यात
सांगली : कडेगाव तहसीलदार कायार्लयातील अव्वल कारकून सुनील दादासो चव्हाण (वय ४९, रा. इस्लामपूर) याला दहा हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी चव्हाण याच्याविरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चव्हाण याला २०२० मध्येही लाच घेताना अटक करण्यात आली होती. चव्हाण दुसऱ्यांदा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने शेतातून जाण्या-येण्यासाठी गाडी रस्ता मंजूर करून देण्यासाठी कडेगाव तहसीलदार कायार्लयात अजर् केला होता. याबाबत कायार्लयात सुनावणी सुरू होती. शिवाय तक्रारदाराच्या शेतीच्या सातबारावरील कुळकायदा शतर् हटवण्यासाठीही त्यांनी अजर् केला होता. या दोन्ही कामात मदत करण्यासाठी अव्वल कारकून सुनील चव्हाण याने त्यांच्याकडे १५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर चव्हाण याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विजय भिलारे, दत्तात्रय पुजारी, अविनाश सागर, सलीम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, संजय कलकुटगी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
