Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनिल लाडच्या चौकशीतून खुनाचा उलघडा

अनिल लाडच्या चौकशीतून खुनाचा उलघडा


तत्कालीन उपाधीक्षक पाटील यांची साक्ष ; चौकशीत घटनास्थळ, मृतदेह दाखवला  


सांगली, ता. २७ ः कोथळे खून खटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अनिल लाड यांची चौकशी केली. त्या चौकशी दरम्यान साऱ्या खुनाचा उलघडा झाला. तसेच घटनास्थळ आणि महादेवगड डोंगर येथे मृतदेह जाळलेले ठिकाणही दाखवल्याची महत्वपुर्ण साक्ष तत्कालीन पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांनी आज न्यायालयासमोर नोंदवली. जिल्ह्या व सत्र  न्यायाधीश आर.के.मलाबादे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास घेतला.

थर्ड डिग्रीचा अवलंब करून सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ ला संशयित अनिकेत कोथळे याचा खून करण्यात आला. या घटनेने राज्याच्या पोलिस दलाला हादरा बसला होता. या खटल्यात सरकारची बाजू विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मांडत आहेत. आजपासून सुनावणीलास सुरूवात झाली. या खटल्यात बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, वाहनचालक राहुल शिंगटे आणि झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले आदी संशयित आहेत. एक संशयित हवालदार अरुण टोणे याचा आजाराने कारागृहातच मृत्यू झालेला आहे.

आजच्या सुनावणीत तत्कालीन उपाधीक्षक धीरज पाटील यांनी साक्ष नोंदवली. ते म्हणाले,‘‘पोलिस अधीक्षकांच्या सुचनेनुसार निरीक्षक राजन माने यांच्याकडून तपास घेतला. त्यावेळी संशयित आरोपी अनिल लाड यास समक्ष हजर केले. गुन्ह्याविषयी विचारपुस करून पंचासमक्ष अटक केली. राजन माने यांना उर्वरित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. लाड यास गुन्ह्यासंदर्भात विश्‍वात घेवून माहिती घेतली. त्यावेळी त्याने कोथळे याचा मृतदेह चारचाकी (एमएच १० सीएल ८३२) मधून महादेवगड डोंगरात नेला. त्याठिकाणी मृतदेह जाळल्याचे सांगितले. त्यानुसार घटनास्थळी पंचसमक्ष पंचनामा करण्यात आला.’’ सरतपासादरम्यान सरकार पक्षाचे वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. 

साक्षीदार पाटील यांचा अ‍ॅड. निकम यांनी सरतपास घेतल्यावर बचाव पक्षाचे अ‍ॅड. विकास पाटील-शिरगावकर, अ‍ॅड. गिरीश तपकिरे, ॲड. प्रमोद सुतार यांनी उलट तपास सुरू केला. जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, ‘सीआयडी’चे  तत्कालीन उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक मनोज बाबर यांनी सरकार पक्षास सहकार्य केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.