पोलिसांवर कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन देण्याबाबत
अजर्दार प्रभात परशुराम हेटकाळे, रा. मिरज, जि. सांगली
नुकताच गेल्या दोन वषार्च्या कालावधीनंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील जनतेला दोन वषार्नंतर गणेशोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली. यावेळी आपल्या आदेशाने निबर्धमुक्त उत्सव साजरा झाला. या अकरा दिवसाच्या उत्सवात पोलिसांनी डोळ्यात तेल घालून बंदोबस्त केला. गणेश चतुथीर्नंतर दीड दिवसाच्या गणपतीसह पाचव्या, सातव्या, नवव्या आणि अनंत चतुदर्शी दिवशीच्या विसजर्नाला पोलिसांचा चांगला बंदोबस्त होता. मूतीर् प्रतिष्ठापनेपासून ते विसजर्नापयर्त पोलिसांनी आपल्या आदेशानुसार त्यांचे कतर्व्य चोख बजावले. त्यामुळे यावषीर् जनतेला उत्साहात आणि निबर्धमुक्त उत्सव साजरा करण्यात आला. याबद्दल राज्यातील जनतेच्या वतीने आपले हादिर्क आभार मानतो.
अनंत चतुदर्शी दिवशी सवर् गणरायांचे विसजर्न झाल्यानंतर सांगली, मिरजेसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पोलिसांनी विसजर्न पूणर् झाल्यानंतर नृत्य करत जल्लोषात त्यांच्या गणरायाला भावपूणर् निरोप दिला. मिरजेसारख्या संवेदनशील शहरात हा उत्सव उत्साहात साजरा झाला. संपूणर् उत्सवादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. २००९ मधील दंगलीच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाही पोलिसांच्या तत्परतेमुळे यावषीर् उत्सवादरम्यान मोठा उत्साह दिसून आला. सलग ११ दिवस बंदोबस्त करूनही पोलिसांच्या गणरायाचे सवार्त शेवटी विसजर्न करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी गणरायाला निरोप देताना ढोलाच्या ठेक्यावर ताल धरला. उत्सव निविर्घ्नपणे पार पडल्याने आनंद साजरा केला.
आपल्या आदेशांचे तंतोतंत पालन करत पोलिसांनी त्यांचे कतर्व्य बजावले आहे. त्यामुळे विसजर्नावेळी पोलिसांनी केलेले नृत्य, जल्लोष याबाबत कोणीही तक्रारी केल्या तरी आपण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशी आपल्याला नम्र विनंती आहे. आपण राज्यातील कोणत्याही पोलिसांवर कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन द्यावे अशीही आपल्याला विनंती आहे.
प्रभात हेटकाळे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
