राम रहीमला चार महिन्यात दुसऱ्यांदा पॅरोल, आता 40 दिवसांसाठी बाहेर येणार
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला पुन्हा एकदा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. गुरमीत राम रहीम ला हत्या आणि बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांती शिक्षा झाली आहे. पीटीआय ने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
वृत्तसंस्था एएनआय ने पोलिसांच्या हवाल्याने सांगितलं की पॅरोलशी निगडीत कागदपत्रांची पूर्तता होणं अद्याप बाकी आहे. 21 जानेवारीला राम रहीमची सुटका केली जाईल. सध्या तो रोहतकच्या तुरुंगात आहे. गेल्या चार महिन्यात राम रहीमला दुसऱ्यांदा पॅरोलवर सोडण्यात आलं आहे. याआधी ऑक्टोबरमध्येही त्याला 40 दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता.
हरियाणाचे तुरुंग मंत्री रंजीत सिंह चौटाला एएनआयशी बोलताना म्हणाले, "डेराच्या प्रमुखान तुरुंग अधिकाऱ्यांना राम रहीमला एक महिन्याचा पॅरोल देण्यासाठी निवेदन दिलं होतं. मात्र किती दिवसाचा पॅरोल द्यायचा हे आयुक्त ठरवतील." डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाला हरियाणाच्या पंचायत समितीच्या निवडणुका आणि आदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान पॅरोल मिळाला होता. राम रहीम 17 जून ला एक महिन्याच्या पॅरोलवर बाहेर आला होता. राम रहीम त्याच्या दोन महिला शिष्यांवर बलात्काराच्या आरोपाखाली 2017 पासून अटकेत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.