Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेला जिनसेन भट्टारक महाराज नांदणी यांची सदिच्छा भेट

कर्मवीर पतसंस्थेला जिनसेन भट्टारक महाराज नांदणी यांची सदिच्छा भेट


सांगली :-
नुकतेच कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेला जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठसंस्थान नांदणी यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी त्यांचे पादप्रक्षालन केले. महाराजांचे विधीवत स्वागत करण्यात आले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी हे देखील उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा सादर केला. संस्थेच्या ८३० कोटी आहेत.. रु. ५७२ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. भागभांडवल रु. २८ कोटी असून ७५ कोटी स्वनिधी आहे. संस्थेची सभासद संख्या ५२००० आहे. संस्थेची गुंतवणुक ३३१ कोटी इतकी आहे. संस्थेचे खेळते भांडवल ९८५ कोटी असून एकूण व्यवसाय रु.१४०५ कोटी इतका आहे. संस्थेच्या ५८ शाखामधून ठेव योजनाना सभासदांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराजांनी शुभाआर्शिवचन देताना संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या कार्याची मला पुर्वी पासून माहिती आहे. आज प्रत्यक्ष संस्थेत येण्याचा योग आल्याचे महाराजांनी सांगितले. संस्था अतिशय नम्रतापुर्वक सेवा देत असल्याची बाब महाराजांनी आवर्जून सांगितली. मी धार्मिक कार्यासाठी नेहमी अनेक भागात जात असतो पण ही एक आदर्श संस्था असून या संस्थेचा काळ उज्वल असल्याचे महाराज म्हणाले.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांचा डॉ. रमेश वसंतराव ढबू यांचे हस्ते व सावकार मादनाईक यांचा अॅड. एस. पी. मगदूम यांचे हस्ते सत्कार करणेत आला. या कार्यक्रमास संस्थेचे व्हा.चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक श्री. ओ. के. चौगुले (नाना ) श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले. डॉ. एस.बी. पाटील (मोटके) संचालिका श्रीमती भारती चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेद्र आनंदा खाडे श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे हे उपस्थित होते. आभार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी मानले. कार्यक्रमास संस्थेचे सेवक व अधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.