Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कारागृहासाठी जागा निश्चित बघायला लागणार आहेच..

कारागृहासाठी जागा निश्चित बघायला लागणार आहेच..तसेच आरटीओ ऑफिस साठी सुद्धा जागा लागणार आहे त्याबाबत कोणाची दुमत नाही. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगली शहरापासून नजीक असणाऱ्या कोल्हापूर येथील 160 एकर जागा व वाढीव धावपट्टीसाठी लागणारी अतिरिक्त जागा सदर जागेवर पद्मभूषण माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांनी दूरदृष्टीतून आरक्षित केलेल्या धावपट्टीची जागा आजतागायत आरक्षित आहे असे असताना सदर जागेवर अन्य पर्याय सुचवणे हे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे.

राज्यकर्त्यांचे राजकीय मनसुबे काहीही असतील मात्र शहराचे व जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योग्य अशा बाबतीत एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे कोण मागणी करतात कोण पुढाकार घेतोय किंवा कोणतं माध्यम पुढे येत आहे हे न पाहता जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जो चांगला पर्याय आहे. त्याला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे नाहीतर तुमचा पक्षीय व निवडणुकीचे राजकारण तुम्हाला लखलाभ असो प्रत्येकाच्या युगो अथवा मागणीनुसार शहराचा जिल्ह्याचा विकास शक्य नाही सांगली जिल्ह्याला लागलेला शाप कधी संपणार आहे देव जानो.. - सतीश साखळकर


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.