Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज तालुक्यातील महिलांना स्वावलंबी बनवणार - प्रा, प्रमोद इनामदार

मिरज तालुक्यातील महिलांना स्वावलंबी बनवणार - प्रा, प्रमोद इनामदार


भोसे तालुका मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ,या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करताना ,मिरज विधानसभा क्षेत्र ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ,प्रा,प्रमोद इनामदार सर म्हणाले की, मिरज तालुक्यात बचत गट मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना आम्ही आर्थिक ताकद देऊन बळकटीकरण करणार आहे, मिरज तालुक्यातील महिलांना स्वावलंबी करून स्वतःच्या पायावर उभा करण्याचा आमच्या पक्षाचा विचार आहे ,स्त्रियांना आर्थिक, सामाजिक, राजकीय ,ताकद देणे हे आमचे पक्षाचे धोरण आहे ,एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते म्हणून त्यांना व्यावसायिक शिक्षण देणे व स्वयंपूर्ण बनवणे हेच आमच्या समोरचे ध्येय आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख ,सौ,सुस्मिता जाधव या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगलीचे सभापती श्री दिनकर पाटील, सोनीच्या सरपंच सौ शारदा यादव ,भोसेचे सरपंच सरपंच श्री, संजय भोसले ,सौ ,स्मिता पाटील ,श्रीमती ,माणिकताई माळी, विविध गावचे सरपंच, पोलीस पाटील, सोसायटीचे संचालक व महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे संयोजन सांगली जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ,अनिताताई कदम यांनी केले होते ,स्वागत व प्रास्ताविक सौ वर्षा होवाळे यांनी केले तर आभार सौ अपर्णा कवठेकर यांनी मांडले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.