Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा बाळासाहेब ठाकरेंचा आजन्म ऋणी! - संजय राऊत

जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा बाळासाहेब ठाकरेंचा आजन्म ऋणी! - संजय राऊत


मुंबई : 'महाराष्ट्र आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा आदरनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आजन्म ऋणी राहील', असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने केले आहे. राज्यभरात बाळासाहेब ठाकरे यांची 97 वी जयंती असून बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज (23 जानेवारी) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी स्वाभिमाने आणि ताठ मानेने जगता यावे. यासाठी 55 वर्षे आपल्या आयुष्यातील झिज सोसली. संघर्ष केला. राजकीय लढाया केल्या तुरुंगवास भोगला. प्रबळ सक्तीची दिल्ली आणि महाराष्ट्र अकशर्षहा युद्ध केले. तेव्हा कुठे ही मुंबई मराठी माणसाची होऊ शकली. आणि आजही या मुंबईवर मराठी माणसाचा पकडा आहे. आणि लढत रहा. रडू नकोस, संकटाच्या छातीवर पाय रोऊन उभा रहा. हा बाळासाहेब ठाकरेंचा मराठी माणसासाठी मंत्र होता. आणि आज जो आपल्याला महाराष्ट्र किंवा मराठी बाणाने म्हणून जे काही आपण जगत आहोत. ती बाळासाहेब ठाकरेंची देण गी आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा आदरनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आजन्म ऋणी राहील आणि कृतज्ञ राहिल.”


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.