Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता अजित पवार यांचा सांगली जिल्हा दौरा

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता अजित पवार यांचा सांगली जिल्हा दौरा


सांगली दि. 19  : महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता अजित पवार हे शुक्रवार, दि. 20 जानेवारी 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह तासगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता मोटारीने प्रयाण. सकाळी 11.30 वाजता आरवडे ता. तासगाव येथे आगमन व आरवडे येथील विविध कार्यक्रमास उपस्थिती – भारत-पाकिस्तान युध्दात शहीद जवानांच्या स्मारकास व स्वातंत्र्य सैनिक स्मारकास अभिवादन, मॉडेल स्कूल (जि.प. शाळा आरवडे) च्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ, आरवडे ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण, ग्रामपंचायत मंगल कार्यालय, आरवडे येथे सत्कार समारंभ. 

नंतर हरे कृष्ण मंदिर (आरवडे ता. तासगाव) दर्शन. दुपारी 1 ते 1.45 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.45 वाजता मोटारीने प्रयाण. दुपारी 2.10 वाजता ग्रेपसिटी वायनरी सावळज ता. तासगाव येथे आगमन व ग्रेपसिटी वायनरी पाहणी, सांगली जिल्ह्यातील प्रमुख द्राक्षशेती शेतकरी व द्राक्षबागायत संघाचे पदाधिकारी यांच्याशी द्राक्षशेतीच्या प्रश्नांबाबत चर्चा. दुपारी 2.40 वाजता मोटारीने प्रयाण. दुपारी 3 वाजता अंजनी ता. तासगाव येथे आगमन व स्वर्गीय आर.आर. (आबा) पाटील निर्मलस्थळ स्मारकास अभिवादन. दुपारी 3.10 वाजता राखीव. दुपारी 3.50 वाजता मोटारीने प्रयाण. दुपारी 4 वाजता मणेराजुरी ता. तासगाव येथे आगमन व आठवणीतले आबा पुस्तक अनावरण, शेतकरी मेळावा. नंतर मोटारीने प्रयाण.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.